हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस दाखल करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना तातडीने बडतर्फ करा
: आ.संग्राम जगताप
माय नगर वेब टीम
अहिल्यामगर - धीरज परदेशी खून प्रकरणी आमदार संग्राम जगताप यांनी शुक्रवारी मुंबई येथे पत्रकार परिषद घेऊन भूमिका व्यक्त करताना गंभीर आरोप केले. यावेळी बोलताना संग्राम जगताप म्हणाले, धीरज परदेशी खून प्रकरणाची खरी घटना व त्यामागील आमच्या भावना राज्य सरकारपर्यंत पोहोचाव्यात व पीडित कुटुंबीयांना त्वरित न्याय मिळावा यासाठी मुंबईत पत्रकार परिषद घेत आहे. याप्रकरणी नगरच्या पोलीस प्रशासनाची भूमिका संशयास्पद आहे. घटना घडल्यानंतर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा आवाज पोलीस दाबत असून त्यांच्यावर अनेक खोटे गुन्हे दाखल करत या प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा पोलीस अधिकाऱ्यांचा प्रयत्न आहे. पोलीस अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद असून त्यांनी अद्याप मुख्य आरोपी कोण आहेत हे निष्पन्न केले नसून त्यांना अटकही केलेली नाहीये. जे आरोपी अटक केले ते मारेकरींना मदत करणारे आरोपी पकडले आहेत. पोलीस अधिकारी प्रमुख आरोपींना पाठीशी घालत आहे का? अशी शंका व्यक्त होत आहे. नगरच्या पोलीस अधिकारी ही घटना वेगळा मार्गावर नेण्याच्या प्रयत्नात आहे. याला वाचा फुटावी, न्याय मिळाला यासाठी लवकरच राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहोत. आरोपीचे अनाधिकृत घरे पाडण्याच्या आदेशाला आरोपींनी लावलेली स्थगिती ताबडतोब उठवावी व घर पडण्याची कारवाई त्वरित करावी, धीरजच्या मारेकरींना तातडीने अटक करून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी चांगल्यातल्या चांगला सरकारी वकीलाची नियुक्ती करावी, धीरजच्या पत्नी मागे आम्ही हिंदुत्ववादी सर्वजण खंबीरपणे उभे आहोतच पण त्यांना शासनानेही सन्मान जनक नोकरी देणे आवश्यक आहे, अशा मागण्या मुख्यमंत्र्यांना भेटून करणार आहोत. हिंदुत्ववाद्यांवर या खोट्या केसेस दाखल करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना तातडीने बडतर्फ करण्यात यावे, पीडित परदेशी कुटुंबाला त्वरित न्याय मिळावा, अशी मागणी आमदार जगताप यांनी यावेळी केली.
आ.जगताप पुढे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी या आधीच आमच्याला आंदोलन चालू असतानाही सर्वांशी संवाद साधून आश्वासित केले आहे. मात्र अंत्यविधीच्या वेळी झालेल्या हिंदुत्ववाद्यांच्या आंदोलना नंतर पोलिसांची तपासाची भूमिका संशयास्पद आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची दाट शक्यता आहे. नगर जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक वैभव कलूबुर्गे, डीवायएसपी दिलीप टिपरसे यांनी गेल्या दोन दिवसापासून नगर शहरातील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना टार्गेट करून वेगवेगळ्या केस मध्ये अडकवत आहेत. त्यामुळे या प्रकरणाला हे वरिष्ठ पोलीस अधिकारी वैयक्तिक वेगळा रंग देण्याच्या प्रयत्नात आहेत, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून देणार आहे. या घटनेच्या बाबतीत आमचा आता पोलिसांवर विश्वास राहिलेला नाहीये त्यामुळे आयजी व डीआयजी यांनी वाटल्यास वेगळ्या अधिकाऱ्यांची नियुक्ती या प्रकरणी केली तरच योग्य पद्धतीने तपास योग्य दिशेने तपास जाईल.
अ.जगताप म्हणाले, पोलिसांच्या म्हणण्या प्रमाणे जर मूळ एफआयआर मध्ये वेगळी नोंद झाली तर ते न्यायालयात सिद्ध करण्यास अधिक वेळ लागेल. त्यामुळे याप्रकरणी जे सत्य घडले आहे, जे परदेशी कुटुंबियांचे म्हणणे आहे त्यानुसारच एफआयआर व्हावी व त्या पद्धतीने तपास व्हावा. तसेच धीरजच्या खुनाच्या घटनेआधी नेमके काय काय घडले, घटना कशी घडली, कोणी घडवली, याचा तपास पोलिसांनी अद्याप केलेला नाहीये. मुख्य आरोपींनाचाही शोध अद्याप लागलेला नाहीये. हिंदू म्हणूनच धीरजला मारले या दाव्यावर आम्ही आजही ठाम आहोत. मुकुंदनगर मध्ये महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना याआधीही मारहाण करण्याच्या अनेक घटना घडलेली आहेत. मात्र एखाद्याचा खून करण्यापर्यंत आता त्यांची मजल जात आहे.
स्व.धीरज परदेशी यांची पत्नी पल्लवी परदेशी म्हणाल्या, माझ्या पतीच्या निधनानंतर सोशल मीडिया माध्यमातून मोठ्या प्रमाणात खोटे आरोप केले जात आहेत. माझ्या पतीची याप्रकरणी काहीही चूक नाहीये. ते मूळचेच धार्मिक व हिंदू विचाराचे होते. ते रोजच अभिमानाने भगवा टिळा लावत असे. घटना घडली त्यादिवशी दुपारी एक वाजता माझे व पतीचे फोन द्वारे शेवटचे संभाषण झाले. त्यांचा व आरोपींचा काही एक संबंध नाहीये तसेच त्यांचे कोणाशीही भांडण नव्हते. तरीही पोलीस अधिकारी काही खोट्या व चुकीच्या पद्धतीने हे प्रकरण येत आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी आम्हाला त्वरित न्याय द्यावा व आरोपींना कडक शासन करावे, अशी मागणी त्यांनी केली.

Post a Comment