पुण्यात तीन बांगलादेशी ताब्यात!



विशेष शाखा आणि मिलिटरी इंटेलिजन्सची संयुक्त मोहीम; बेकायदेशीर वास्तव्यासंदर्भात चौकशी

माय नगर वेब टीम 

पुणे - पुणे शहरात बेकायदेशीरपणे वास्तव्यास असल्याच्या संशयावरून विशेष शाखा (SB), पुणे आणि मिलिटरी इंटेलिजन्स (MI), पुणे यांच्या संयुक्त पथकाने कारवाई करत तीन बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले.

मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दि. २७ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी सुमारे ३ वाजता ही कारवाई करण्यात आली. लष्करी गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संबंधित ठिकाणी छापा टाकण्यात आला. या कारवाईत सोनिया अख्तर, मोतियार गाजी आणि सोनिया मोती पान या तिघांना ताब्यात घेण्यात आल्याचे वृत्त आहे.

ताब्यात घेतलेल्या तिघांची प्राथमिक चौकशी आणि कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार, त्यांच्या भारतातील प्रवेश व वास्तव्याबाबत आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले आहे.

दरम्यान, तिन्ही जणांविरुद्ध स्थानबद्धता (Detention) आदेशाची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना बांगलादेशात परत पाठविण्याची कार्यवाही केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

या कारवाईनंतर पुणे शहरातील संवेदनशील भागांमध्ये गुप्तचर यंत्रणा आणि पोलिसांकडून निगराणी अधिक कडक करण्यात आली आहे. वैध कागदपत्रांशिवाय वास्तव्यास असलेल्या व्यक्ती तसेच अशा प्रकारच्या नेटवर्कचा शोध घेण्यासाठी तपास आणि पडताळणी मोहीम सुरू असल्याचे समजते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post