बाबुर्डी बेंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शिल्पा शरद चोभे बिनविरोध



 बाबुर्डी बेंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शिल्पा शरद चोभे बिनविरोध

माय नगर वेब टीम 

अहिल्यानगर : नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शिल्पा शरद चोभे यांची बिनविरोध निवड झाली. सरपंच मंदाताई सुनील खेंगट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवड प्रक्रियेत शिल्पा चोभे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली.



यावेळी माजी उपसरपंच भाऊसाहेब चोभे, वंदना भाऊसाहेब निमसे, हिराबाई अशोक चोभे, विजय वाळके आदी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका लावण्या डोन्टा यांनी निवड प्रक्रियेचे कामकाज पाहिले.

निवडीनंतर नूतन उपसरपंच शिल्पा चोभे यांचे ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. यावेळी गावचे ज्येष्ठ नेते लहुकुमार चोभे, खंडेश्वर सहकारी संस्थेचे चेअरमन शरद चोभे, व्हाईस चेअरमन लहू कासार, अंबादास साठे, भाऊसाहेब निमसे,  वैभव खेंगट,  आण्णा चोभे, बाळासाहेब खेंगट, विकास चोभे, अक्षय खेंगट, आकाश चोभे, श्रीनाथ खेंगट, सागर चोभे मेजर आदी उपस्थित होते.

शिल्पा चोभे यांच्या बिनविरोध निवडीमुळे ग्रामपंचायतीच्या विकासकामांना अधिक गती मिळेल, असा विश्वास यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केला. नूतन उपसरपंच शिल्पा चोभे यांनी ग्रामस्थांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभार मानत गावाच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची भूमिका व्यक्त केली. उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल शिल्पा चोभे यांचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post