निंबळक ग्रामपंचायतच्या वतीने होणार स्री जन्माचे स्वागत मासिक सभेत ठराव मंजुर ; उपक्रमाचे कौतुक

 माय अहमदनगर वेब टीम



नगर तालुका- नगर तालुक्यातील निंबळक ग्रामपंचायत च्या वतीने स्री जन्माचे स्वागत करण्याचा ठराव मासिक सभेमध्ये मंजूर करण्यात आला आहे. या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

      सरपंच सौ. प्रियंका अजय लामखडे यांनी गावामध्ये मुलगी जन्माला आल्यानंतर तिचे स्वागत करण्याचा ठराव मांडला. त्यास सौ. राणी विजय दिवटे यांनी अनुमोदन दिले. उपक्रम चांगला असल्याने सदर ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे. ग्रामपंचायत च्या वतीने ज्या महिलांना फक्त मुली आहेत. तसेच ज्या महिलांनी मुलीला जन्म दिला अशा सर्वांचा सत्कार करून स्री जन्माचे स्वागत करण्यात येणार आहे.  निंबळक ग्रामपंचायतच्या या उपक्रमाचे तालुक्यात कौतुक होत आहे.



      यावेळी बोलताना सरपंच प्रियंका लामखडे यांनी सांगितले की, स्री जन्माचे स्वागत करून मुलींना प्रोत्साहित करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. आज महिला विविध क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कार्य करत आहेत. मुलींच्या जन्माबाबत न्यूनगंड न बाळगता त्यांचा अभिमान बाळगणे गरजेचे आहे. स्त्रियांना आदर सन्मान मिळणे गरजेचे आहे.

        यापूर्वी देखील निंबळक ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण, विधवांचा सन्मान असे विविध ठराव घेण्यात आलेले आहेत. सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या सहकार्याने गाव विकास तसेच समाजातील अनिष्ट रूढी, परंपरा  बंद करण्यासाठी ग्रामपंचायत प्रयत्नशील असल्याचे सरपंच सौ. लामखडे यांनी सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post