बँकेच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारताच कर्डीले यांची मोठी घोषणामाय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाचा पदभार माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी स्वीकारला. यावेळी बँकेचे संचालक अण्णासाहेब म्हस्के, सीताराम गायकर, माजी आमदार भानुदास मुरकुटे, अक्षय कर्डिले, बाबासाहेब भोस, प्रशांत गायकवाड, संचालिकाअनुराधा नागवडे, मीनाक्षी पठारे, अंबादास पिसाळ, अमित भाकरे, अमोल राळेभात आदी उपस्थित हाेते.''अहमदनगर जिल्हा बँकेवर माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला दोन वेळेस चेअरमनपदाची संधी मिळाली आहे. बँकेच्या माध्यमातून शेतकरी, कारखानदार, व्यवसायिक व महिला बचत गट यांना मदत केली जाईल. आज सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या पुण्यतिथीनिमित्त पदभार स्वीकारला आहे. बँकेचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी लवकरच सातशे कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे. त्यानंतर उर्वरित पाचशे कर्मचाऱ्यांचीही भरती केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेमध्ये जिल्ह्यातील उमेदवारांना संधी देण्याचे काम केले जाईल.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post