‘जम्मू काश्मीर, लडाखच्या कायापालटाचे काम प्रगतीपथावर’



माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - जम्मू काश्मीर आणि लडाखचा वेगाने कायापालट केला जात असून गेल्या वर्षभरात या ठिकाणी विकासाची असंख्य कामे हाती घेण्यात आली असल्याची माहिती परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी बुधवारी सोशल मीडियाद्वारे दिली. जम्मू काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम ३७० संपुष्टात आणून एक वर्ष पूर्ण झाले आहे, यानिमित्ताने त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. 

बरोबर एक वर्षापूर्वी केंद्र सरकारने कलम ३७० संपुष्टात आणून जम्मू काश्मीर तसेच लडाख अशा दोन केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती केली होती. सुधारणावादी कायदे अंमलात आणणे, सामाजिक न्याय, सबलीकरण तसेच गोरगरीब वर्गाच्या हिताच्या योजना राबविण्यास सुरुवात करण्यात आली असल्याचे सांगून जयशंकर पुढे म्हणतात की, शिक्षणाचा विस्तार करण्यात आला असून विविध प्रकारच्या विकासकामांमुळे रोजगार निर्मिती होत आहे. महिलांच्या अधिकारांचे देखील रक्षण केले जात आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post