माय नगर वेब टीम
अहिल्यानगर : अकोळनेर येथील जाधववाडी शिवारात शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत शेतकरी आबासाहेब केरू कोठुळे यांचा सुमारे एक एकर क्षेत्रातील गहू जळून खाक झाला. या घटनेमुळे संबंधित शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून प्रशासनाने तातडीने पंचनामा करून मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थ व स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अकोळनेर येथील जाधववाडी शिवारात अचानक विद्युत तारेत शॉर्ट सर्किट होऊन ठिणग्या पडल्या. त्यातून लागलेल्या आगीत आबासाहेब केरू कोठुळे यांच्या शेतातील उभा असलेला गहू काही वेळातच जळून खाक झाला. आग वेगाने पसरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत सुमारे एक एकर गव्हाचे पीक जळाले होते.
या घटनेनंतर गावातील पदाधिकारी व ग्रामस्थांनी शेतकऱ्याची भेट घेऊन धीर दिला. तसेच शासनाने तातडीने पंचनामा करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी सरपंच भाऊसाहेब बहिरट, सरपंच प्रतीक शेळके, कैलास तात्याराम कोठुळे, नंदू रोकडे, अशोक सदाशिव कोठुळे, बाळू आवळाजी कोठुळे, नवनाथ कोठुळे, नवनाथ रोकडे, उपसरपंच अनिल पोपट कोठुळे आदींनी प्रशासनाकडे तातडीने मदतीची मागणी केली आहे.


Post a Comment