देशात सव्वापाच लाख चाचण्या



माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - देशात सोमवारी एका दिवसात उच्चांकी 5 लाख 28 हजार 82 नागरिकांची वैद्यकीय तपासणी झाली. गेल्या 24 तासांत 47 हजार 704 कोरोनाबाधितांची भर पडली. तर 654 रुग्णांचा मृत्यू झाला. दिलासादायक बाब म्हणजे, सोमवारी 35 हजार 175 रुग्णांनी कोरोनावर मात केली.

देशात सोमवारी 5 लाख 28 हजार 82 नागरिकांची वैद्यकीय तपासणी झाली. आतापर्यंत 1 कोटी 73 लाख 34 हजार 885 नागरिकांच्या वैद्यकीय तपासण्या केल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने दिली आहे.

देशातील कोरोनाबाधितांची संख्या आता 14 लाख 83 हजार 157 झाली आहे. यातील 9 लाख 52 हजार 744 रुग्ण (64.24 टक्के) कोरोनामुक्‍त झाले आहेत. देशात आतापर्यंत 33 हजार 425 रुग्णांचा (2.25 टक्के) मृत्यू झाला. तर 4 लाख 96 हजार 988 (33.51 टक्के) कोरोना रुग्णांवर देशातील विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. एकूण कोरोनामुक्‍त तसेच मृत्यूचे प्रमाण हे अनुक्रमे 96.6 टक्के तसेच 3.4 टक्के एवढे झाले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post