अहिल्यानगर :
महानगरपालिका प्रभाग क्रमांक १६ मध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अपक्ष उमेदवारांची जोरदार चर्चा सुरू असून, या प्रभागात यावेळी अपक्षांचीच “जादू” चालणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. जेष्ठ नेते भानुदास कोतकर यांनीही अपक्ष उमेदवार यांच्यासाठी मैदान पिंजून काढले आहे. ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर यांनी प्रचाराची सूत्र हाती घेतल्यामुळे निवडणुका रंग चढला आहे.
गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत प्रभागात करण्यात आलेली विविध विकासकामे, तसेच नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांना प्राधान्य देऊन सोडवण्यात आलेली तत्परता, यामुळे मतदारांमध्ये या उमेदवारांविषयी विश्वासाची भावना अधिक बळावली आहे.
रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, पथदिवे, ड्रेनेज, तसेच नागरी सुविधांशी संबंधित प्रश्न वेळेवर मार्गी लावल्याचा अनुभव नागरिकांनी प्रत्यक्ष घेतला आहे. त्यामुळे “काम करणारे आणि उपलब्ध असणारे प्रतिनिधी” हीच या निवडणुकीतील मतदारांची प्रमुख अपेक्षा असल्याचे चित्र दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रभागातील मतदार मोठ्या संख्येने अपक्ष उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
या प्रभागातून निवडणूक रिंगणात उभे असलेले सागर सातपुते, भूषण गुंड, सविता कराळे आणि विमल कांबळे हे सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेले उमेदवार आहेत. सामान्य नागरिकांच्या अडचणी, गरजा आणि अपेक्षा यांची त्यांना प्रत्यक्ष जाण असल्यामुळेच मतदार त्यांच्याशी स्वतःला जोडलेले समजत आहेत. “आपल्यातीलच माणूस” ही भावना मतदारांच्या मनात रुजल्याने या उमेदवारांना मोठ्या प्रमाणात पसंती मिळताना दिसत आहे.
पक्षीय राजकारणापेक्षा स्थानिक विकास, पारदर्शक कामकाज आणि थेट नागरिकांशी संपर्क याला महत्त्व देणारी भूमिका या अपक्ष उमेदवारांनी घेतली आहे. यामुळे पारंपरिक राजकीय समीकरणांवर मात करत अपक्ष उमेदवार प्रभाग क्रमांक १६ मध्ये निर्णायक ठरण्याची दाट शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.
एकूणच, विकासकामांचा ठोस अनुभव, नागरिकांच्या प्रश्नांबाबतची संवेदनशीलता आणि सर्वसामान्यांशी असलेली जवळीक या मुद्द्यांमुळे प्रभाग क्रमांक १६ मध्ये अपक्ष उमेदवारांची बाजू अधिक भक्कम होत असल्याचे राजकीय चित्र सध्या स्पष्टपणे दिसून येत आहे.

Post a Comment