मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुरुवारी ८ जानेवारीला शहरात जाहीर सभा

 


माय नगर वेब टीम

अहिल्यानगर -  महानगरपालिका निवडणूकीतील भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अहिल्यानगरमध्ये येत आहेत. गुरुवार दिनांक ८ जानेवारी रोजी त्यांची शहरात जाहीर सभा होणार आहे. शहरातील मार्केटयार्ड चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारील पांजरपोळ मैदानात दुपारी १ वाजता ही जाहीर सभा होणार आहे, अशी माहिती भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांनी दिली.

            अधिक माहिती देताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर म्हणाले, मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेसाठी प्रमुख उपस्थिती राज्याचे जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे, आ.संग्राम जगताप, माजी खासदार डॉ.सुजय विखे हे उपस्थित राहणर आहेत. या सभेसाठी सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केले आहे.


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post