Health Tips : छातीत जळजळ आणि आंबट ढेकरांमुळे त्रास होतोय?

 


Digestion Problem Home Remedies : अनेक वेळा अन्न खाल्ल्यानंतर छातीत जळजळ आणि आंबट ढेकर येण्याची समस्या उद्भवते. हे तुमच्या खाण्याच्या उलट सुलट सवयींमुळे होतं. जेव्हा तुम्ही तेलकट पदार्थ, मसालेदार अन्न आणि जंक फूडचं सेवन करता तेव्हा त्यामुळे पचनाशी संबंधित समस्या निर्माण होतात. पचनसंस्था खराब झाल्यामुळे छातीत जळजळ आणि आंबट ढेकर येतात. अशा परिस्थितीत काही खास पदार्थांचे सेवन केल्याने तुम्हाला फायदा होईल.

सफरदंचाचं व्हिनेगर

एक कप कोमट पाण्यात एक चमचा सफरचंदाचं सायडर व्हिनेगर आणि मध मिसळून प्या. यामुळे पचनक्रिया सुधारेल आणि गॅसची समस्या होणार नाही.


पपई खा

पपईचे सेवन केल्याने पचनक्रिया व्यवस्थित राहते. पपईमध्ये भरपूर फायबर असते. यामुळे पचनाशी संबंधित समस्या दूर होतील.


गाजर खा

जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर असलेले गाजर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. गाजराचा रस पचनक्रिया व्यवस्थित ठेवतो.


आणखी वाचा : Facial Steaming: चेहऱ्यावर स्टीम घेताना या चुका करू नका, नाहीतर त्रास वाढेल


केळी खा

केळीच्या सेवनाने पचनक्रिया बरोबर राहते. यामध्ये असलेले पोषक तत्व पाण्याची कमतरता पूर्ण करतात आणि पचनक्रिया व्यवस्थित ठेवतात.


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post