भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सोमवारी ५ रोजी युतीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ
माय नगर वेब टीम
अहिल्यानगर – महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपा, राष्ट्रवादी कॉंग्रेस व आरपीआय युतीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ सोमवारी ५ जानेवारी रोजी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरात सकाळी ९ वाजता पूजा करून प्रचाराचा शुभारंभ होणार आहे. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे, आ.संग्राम जगताप, भाजपचे महामंत्री वीजय चौधरी व रवींद्र अनासपुरे, माजी खासदार डॉ.सुजय विखे, निवडणूक प्रमुख आ.विक्रमसिंह पाचपुते तसेच आरपीआयचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांनी दिली.
अधिक माहिती देताना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर म्हणाले, युतीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री राधाकृष्ण विखे व आ.संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य रॅली निघणार आहे. ही रॅली माळीवाडा, पंचपीर चावडी, माणिक चौक, कापडबाजार, तेली खुंट, चीतळे रस्ता मार्गे दिल्लीगेट येथे आल्यावर याठिकाणी सकाळी ११ वजता भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे.
या प्रचार शुभारंभास व जाहीर सभेस युतीच्या सर्व उमेदवारांसह भाजपा, राष्ट्रवादी कॉंग्रेस व आरपीआय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी तसेच नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन युतीच्या वतीने करण्यात आले आहे.


Post a Comment