माय नगर वेब टीम
अहिल्यानगर : महापालिका निवडणुकीमध्ये प्रभाग सात मध्ये निवडणूक वेगळ्या वळणावर येऊन ठेपलीय. आम आदमी पार्टीचे उमेदवार भरत खाकाळ यांच्या उमेदवारीने विरोधकांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. खाकाळ आता विजयाच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचले असल्याची माहिती प्रभागातील नागरिक सांगत आहेत. मागील महापालिका निवडणुकीतही भरत खाकाळ यांनी निर्णायक मते घेतली होती. आताही सावेडी गावातून खाकाळ यांना एकमुखी पाठिंबा मिळत आहे. तसेच आप चे उमेदवार भरत खाकाळ यांचा जाहीरनामा प्रभागात चांगलाच चर्चेत आला आहे.
*मी हे करू शकतो, माझा स्वतः चा जाहीरनामा*
💁🏻♂️ महिलांना मोफत सेवा केंद्र द्वारे लाडकी बहीण योजना निराधार, विधवा तसेच अनेक योजना चे आतापर्यंत रुपये काढून दिले ही सेवा पुढे पण निरंतर चालू राहणार, गल्लीबोळातील प्रत्येक गरिबांच्या घरापर्यंत सर्व सोयी देण्यात येतील.
💁🏻♂️ जनतेच्या विकास कामासाठी महानगरपालिकेत जी महासभा घेतली जाते त्याची महासभेच्या पहिले विस्तृत माहिती तारिख आणि वेळ आणि महासचे नंतर काय झाले किंवा ठराव शहराच्या / प्रभागांच्या कारभारासाठी, धोरणात्मक निर्णय, ठराव मंजूर आणि उपविधी याबद्दल त्याची संपूर्ण माहिती प्रभागातील सर्व जनतेला विविध माध्यमातून प्रत्येक वेळी दिली जाईल.
💁🏻♂️ प्रभागातील नवीन विद्युत स्मार्ट मीटर वर बंदी.
💁🏻♂️ वाढीव कर (घरपट्टी/ पाणीपट्टी) रद्द केली जाईल
💁🏻♂️ प्रभागात सर्व ठिकाणी फ्री वाय-फाय (Wi-fi) सुविधा,
💁🏻♂️ प्रभागातील सर्व गरजूंना MIDC मधील कंपन्या मध्ये रोजगार तसेच नातेवाईक, व्यापारी, मित्र, आप्तेष्ट यांच्या सहकार्याने विविध ठिकाणी उद्योग, व्यापार मध्ये तसेच प्रभागात उत्पन्न निर्मितीचे जे प्रकल्प आपण सुरू करू.. अनेक विविध माध्यमातून रोजगार निर्मिती.
💁🏻♂️ प्रभागात भाजीमंडई / मार्केटची उभारणी केली जाईल
💁🏻♂️ वेळोवेळी मच्छर मारण्यासाठी फवारणी केली जाईल
💁🏻♂️ अवैध धंद्यावर बंदी, धोकादायक व्यवसायावर नियंत्रण वासंबंधी उप कायदे बनवणे आणि त्याची अंमलबजावणी
💁🏻♂️ प्रभागातील कानाकोपन्यात रस्ते टीप टॉप व बंद नाल्यांची कामे दर्जेदार केली जातील. कामाचे इस्टिमेट सर्वां समक्ष लावले जाईल व विविध माध्यमातून कळकले जाईल.
💁🏻♂️ महिला बचत गटांना प्रोत्साहन
💁🏻♂️ आवश्यक ठिकाणी मुतारी व स्वच्छतागृहांची व्यवस्था केली जाईल, सार्वजनिक सुविधांचे बांधकाम आणि देखभाल, पार्किंग यासाठी योजनांवर विचारविनिमय करणे आणि त्यांना मान्यता देणे
💁🏻♂️ कुत्रे व मोकाट जनावरांचा प्रश्न गांभीयनि सोडवला जाईल.
💁🏻♂️ प्रभागासाठी स्वतंत्र स्मशानभूमी.
💁🏻♂️ ज्या ठिकाणी गावठाण असेल त्याचे रूपांतर सिटीसर्वेत.
💁🏻♂️ आवश्यक अशा सर्व विकाणी घनकचरा संकलन केंद्र (कचरा कुंडी उभारणी व प्रत्येक संकलन केंद्रापाशी घंटागाडी कर्मचान्यांची मोबाईल नंबर लावली जातील आणि ते प्रत्येक वेळी अपडेट केले जातील.
💁🏻♂️ महानगरपालिकेच्या प्रभागातील सरकारी शाळा, तसेच १७ नंबर शाळा दिल्ली आणि पंजाबच्या धर्तीवर सात मजली बांधून आधुनिकरण, स्मार्ट डिजिटल क्लास, स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छ शौचालय, विद्यार्थ्यांसाठी चालू स्थितीत खेळ व्यवस्थापन साहित्य, स्विमिंग सुविधा, आधुनिक संगणिकीकरणाचा वापर, शिक्षण गुणवत्ता वाढविणे.
💁🏻♂️ ओपन स्पेस डेव्हलप करून उद्याने, मंदिर, ब्रीडांगणे, मिनी गार्डन, तसेच ग्रंथालय संग्रहालय वाचनालय अभ्यासिका, नाट्यगृहे, स्थापना करणे आणि देखभाल करणे.
💁🏻♂️ तुंबलेल्या नाल्या, साफसफाई व स्वच्छतेला प्रथम प्राधान्य, सांडपाणी व्यवस्था.
💁🏻♂️ नियमित, स्वच्छ व पूर्ण दाबाने पाणीपुरवठा.
💁🏻♂️ मासिक सभा घेऊन जनतेच्या अडचणी समस्या विचारल्या जातील व त्या सोडवल्या जातील
💁🏻♂️ प्रभागातील चौका चौकात महिलांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे
💁🏻♂️ प्रभागातील प्रत्येक खांबावर लाईट लावण्याची व्यवस्था होईल
💁🏻♂️ नाले अतिक्रमन मुक्त, नदी पात्र अतिक्रमणमुक्त, नदीपात्राचे रुंदीकरण, स्वच्छ आणि वृक्षारोपण करून सुशोभीकरण
💁🏻♂️ ज्येष्ठ (महिला/पुरुष) नागरिक, अंध, अपंग दिव्यांगांना, दिव्यांगांसह सामाजिक, कमकुवत, दुर्लभ घटकांच्या हिताचे रक्षण करणे, झोपडपट्टी सुधारणा आणि दारिर्धा निर्मूलनासाठी कार्यक्रम
💁🏻♂️ प्रभागात म्हाडाची घरे, व्यवसायासाठी गाळ्यांचा प्रकल्प, इलेक्ट्रिक अम्बुलन्स सारख्या सुविधा घरपोच.
💁🏻♂️ पाहिजे असलेले प्रमाणपत्र, नागरिकाला घारपोथ दिले जाईल. नागरिकांचे कायदेशीर काम तत्परतेने करण्याची व्यवस्था होईल, दप्तर दिरंगाई होणार नाही, कार्यालयीन कामे शिस्तीत व भ्रष्टचार मुक्त.
💁🏻♂️ प्रेमदान चौक, तसेच विविध चौकात सिग्नल, सीसीटीव्ही लावून कायमस्वरूपी सिग्नल चालू राहतील याची दक्षता आणि ट्राफिक मुक्त साठी नियोजन.
💁🏻♂️ सुका कचरा-खत निर्मिती, बायोगॅस निर्मिती तसेच सोलर पॅनल लावून प्रभागासाठी उत्पक्ष निर्मिती करणे,
आपचा महापौर बनला तर
💁🏻♂️ पाणीपट्टी ना, घरपट्टी हा,
💁🏻♂️ वीज बिल २०० युनिट मोफत
💁🏻♂️ मोहल्ला क्लिनिक सारख्या मोफत आरोयासेवा,
💁🏻♂️ शहरातील १७०० युवक/युक्तींना महानगरपालिकेद्वारे रोजगार
मी हे करू शकतो : स्वः खर्चाने
💁🏻♂️ प्रभागातील ९ वेगवेगळ्या ठिकाणी पाणपोई
💁🏻♂️कोणीही उपाशी पोटी राहू नये म्हणून एका ठिकाणी एक टाइम साठी झुणका भाकर केंद्र
💁🏻♂️ प्रभागातील गरीब नागरीकाचा मृत्यू झाल्यास अंत्यविधी साठी त्या दिवशी परिवारास ५००० रुपये सहाय्यता मदत.
मी विनंती करतो की येत्या निवडणुकीत मला आपल्या प्रभागाच्या सर्वांगीण विकासाची संधी द्यावी पुढील ५ वर्ष कोणतीही महामारी, नैसर्गिक आवती युद्धजन्य परिस्थिती आली तर मी २४ तास ३६५ दिवा मी तुमची सेवा करेल.
मी आपल्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही. हा शब्द मनापासून आपणा सर्वांना देतो.
💁🏻♂️ येत्या १३ तारखेपर्यंत मी तुम्हाला क्वचित दिसेल कारण खोटं वागणं, भेटणं, आश्वासने देणे हे सर्व खोट नाटक मी करणार नाही परंतु १६ तारखेनंतर पुढील ५ वर्षासाठी २४ घंटे ३६५ दिवस मी तुमचा सेवक असेल,
*भरत श्रीराम खाकाळ*
नायब सुभेदार रिटायर आर्मी, जुनियर कमिशनर ऑफिसर
आम आदमी पार्टी शहर जिल्हाध्यक्ष




Post a Comment