सत्य साईबाबांच्या चरणी सांगा ;खासदार नीलेश लंके यांचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान



 महामार्ग प्रश्नावर लंके यांचा आक्रमक पवित्रा

माय नगर वेब टीम

अहिल्यानगर :  नगर–मनमाड महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून खासदार निलेश लंके यांनी सत्ताधाऱ्यांवर तीव्र टीका केली आहे. मागील सात–आठ वर्षांपासून हा महामार्ग अपूर्ण असून, या कालावधीत अनेक ठेकेदारांनी काम अर्धवट सोडून दिले. मात्र, यामागील नेमकी कारणे अद्याप समोर आलेली नाहीत, असा आरोप त्यांनी केला.


      पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना लंके म्हणाले की, महामार्गाचे काम अर्धवट सोडून ठेकेदार का गेले, कुणाला वैतागून गेले, कुणी काय मागणी केली, याची स्पष्ट माहिती समाजासमोर यावी. शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी हात ठेवून सांगा, पैसे कुणी मागितले, असे आव्हान त्यांनी सत्ताधाऱ्यांना दिले.


खासदार नीलेश लंके यांनी सांगितले की, आपण खासदार झाल्यानंतर पुन्हा टेंडर काढून महामार्गाचे काम सुरू करण्यात आले. काही तांत्रिक त्रुटींमुळे काम रखडले; मात्र आता नव्याने टेंडर प्रक्रिया पूर्ण करून काम सुरू आहे. हे महामार्गाचे काम आपल्या कार्यकाळात पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


     केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नगरच्या काही राजकीय नेत्यांबाबत आपल्या समोर केलेल्या वक्तव्याचा संदर्भ देत, सत्य समोर आले तर अनेकांना अडचण निर्माण होईल, असा इशाराही त्यांनी दिला.

नगर–मनमाड महामार्गाच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असून, हा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी खासदार नीलेश लंके यांनी यावेळी केली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post