महापालिकेवर खासदार विखे यांचा गंभीर आरोप, काय म्हणाले पहा....



 खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून व नगरसेवक मनोज कोतकर यांच्या पाठपुराव्यातून केडगाव देवी श्री रेणुका माता देवस्थान मंदिर परिसर सुशोभीकरण कामाचा शुभारंभ संपन्न

माय नगर वेब टीम 

अहमदनगर : सर्वसामान्य आई-वडिलांच्या मुलांचे एमपीएससी यूपीएससीचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी सावेडी बसस्थानक येथे 25 कोटी रुपये खर्च एसी लायब्ररीचे काम करणार आहे, यामध्ये आठशे मुले एकाच वेळी अभ्यास करू शकतात. महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी बचत गटांना आर्थिक मदत देऊन हाताला काम देण्यात येणार आहे. विकास कामांसाठी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून आ.संग्राम जगताप व मी शहर विकासासाठी एकत्र आलो आहोत. निधी कमी पडून दिला जाणार नाही अहमदनगर महानगरपालिकेची कार्य पद्धती बदलली पाहिजे. याचबरोबर छाननी समिती बंद केली पाहिजे, एक काम पूर्ण होण्यासाठी एक-एक वर्ष लागतात अशी मनपा मी कुठेच पाहिली नाही, महानगरपालिकेच्या कार्य पद्धतीमुळे शहर विकासाला खीळ बसत आहे. त्यामुळे कार्यपद्धती बदलणे काळाची गरज आहे, उड्डाणपूल व बायपासचे काम 18 महिन्यात पूर्ण केले आहे. केडगावच्या विकासासाठी निधी कमी पडून दिला जाणार नाही. निवडणुकीच्या काळामध्ये नागरिकांनी सुशिक्षित व आर्थिक सक्षम असणाऱ्या उमेदवाराला निवडून द्यावे, जेणेकरून विकास कामांमध्ये टक्केवारी घेतली जाणार नाही, त्यामुळे विकासाच्या कामांना गती मिळून दर्जेदार कामे मार्गी लागली जातील, नगरसेवक मनोज कोतकर हे विकास कामांसाठी पाठपुरावा करणारे नगरसेवक म्हणून ओळखले जात आहे असे प्रतिपादन खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी केले.

   खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून व नगरसेवक मनोज कोतकर यांच्या पाठपुराव्यातून केडगाव देवी श्री रेणुका माता देवस्थान मंदिर परिसर सुशोभीकरण कामाचा शुभारंभ संपन्न झाला, यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार संग्राम जगताप, उद्योजक सचिन कोतकर, नगरसेवक मनोज कोतकर, माजी नगरसेवक सुनील मामा कोतकर, माजी नगरसेवक सुनील कोतकर, नगरसेवक राहुल कांबळे, नगरसेविका लताताई शेळके, गौरी ननवरे, महेंद्र कांबळे, भूषण गुंड, जालिंदर कोतकर, बच्चन कोतकर, रामदास येवले, धनंजय जामगावकर, पंकज जाहागीरदार, महेंद्र कांबळे, यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    आमदार संग्राम जगताप म्हणाले की, केडगाव देवी श्री रेणुका माता देवस्थान हे भाविकांचे श्रद्धास्थान आहे नवरात्र उत्सवानिमित्त या ठिकाणी राज्यभरातील भाविक दर्शनासाठी येत असतात. सध्या राजकीय स्टंट करणाऱ्यांची संख्या खूप वाढली आहे. आता राज्य सरकार हे महायुतीचे असून नगर शहर उपनगराच्या विकास कामे करण्यासाठी निधी आणणार आहे, केडगावच्या विकासाला खऱ्या अर्थाने गती मिळाली आहे असे ते म्हणाले.

   सचिन कोतकर म्हणाले की, केडगाव उपनगरासाठी आमदार व खासदार यांच्या माध्यमातून विकास कामे सुरू आहे मात्र काही रस्ते अत्यंत खराब झाली असून त्यासाठी दहा कोटी रुपयाचे पॅकेज द्यावे. आमदार, खासदार यांनी विकास कामे करण्यासाठी कायमस्वरूपी एकत्र रहावे असे ते म्हणाले.

    नगरसेवक मनोज कोतकर म्हणाले की, आमदार, खासदार या राम लखन जोडीने मागितलेले सर्व कामे दिले आहेत, या पुढील काळातही राहिलेल्या विकास कामांसाठी निधी द्यावा, दोन पक्षाचे नेते विकासासाठी एकत्र येतात. तेव्हा विकासाची कामे नक्कीच मार्गी लागतात. मंदिर परिसराच्या विकासासाठी 22 कोटी रुपयांची आवश्यकता आहे. हे काम लोक वर्गणीतून मार्गी लागणे शक्य नाही तरी आमदार खासदार यांनी मदत करावी,    खा. सुजय विखे पाटील यांनी मंदिराच्या सुशोभीकरणासाठी 50 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. विकास कामे करण्यासाठी पाठपुराव्याची आवश्यकता असते, यासाठी मी आमदार संग्राम जगताप व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्याकडे सततच्या पाठपुरावा केल्यामुळे मोठा निधी उपलब्ध झाला आहे. टप्प्याटप्प्याने प्रभागातील सर्वच विकास कामे मार्गी लावली जातील, तसेच दळणवळणासाठी अत्यंत महत्वाचा असलेला अरणगाव रेल्वे क्रॉसिंग भुयारी मार्गाचा प्रश्न खा. सुजय विखे पाटील यांनी मार्गी लावला तसेच आमदार संग्राम जगताप यांनी समतानगर व शास्त्रीनगर भागातील ओढ्यातील रस्त्याच्या कामासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे असे ते म्हणाले.


चौकट : नगरसेवक मनोज कोतकर मित्र मंडळ, जगदंबा तरुण मंडळ, शिवमुद्रा ग्रुप यांच्या वतीने खा.सुजय विखे पाटील व आ. संग्राम जगताप यांना श्रीरामाच्या भव्य दिव्य मंदिराची प्रतिकृती भेट दिली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post