डॉ. सुजय काळे यांना आयुष ग्लोबल अवॉर्ड



अहमदनगर : 

डॉ. सुजय काळे यांना आयुष ग्लोबल अवॉर्ड पुरस्कार जाहीर झाला आहे. 

आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन व आयुष ग्लोबल मेडिकल असोसिएशन तसेच विस्तार केंद्र एमएसएमई टी.डी.सि. आग्रा, एमएसएमई मंत्रालय भारत सरकार संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार देण्यात येणार आहे. याचे वितरण २९ ऑक्टोबर रोजी शिर्डी येथे होणार आहे. 

डॉ. सुजय काळे यांनी आयुष चिकित्सासाठी केलेल्या कार्याबद्दल हा ग्लोबल अवॉर्ड देण्यात येणार आहे. शिर्डीत होणाऱ्या या कार्यक्रमासाठी सिनेस्टार देवदत्त नागे उपस्थित राहणार आहे. आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन आंतरराष्ट्रीय पातळीवर व भारतामध्ये काम करणारी मोठी संघटना आहे. अशा इंटरनॅशनल संघटनेतर्फे ग्लोबल अवॉर्ड डॉ. काळे यांना मिळाल्याने त्यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post