ओला-सुका कचऱ्याचे विलगीकरण करावे; नगरसेविका संध्याताई पवार यांचे आवाहन


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - स्वच्छता सर्वेक्षण २०२० अंतर्गत कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी आवश्यक उपाययोजना महापालिकेकडून केल्या जात आहेत. मात्र, सर्वेक्षणात ओला व सुका कचरा नागरिकांनी घरातून वेगळा करून देण्याबाबत निर्देश आहेत. तपासणीमध्ये हा घटक सर्वात महत्त्वाचा आहे. ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे संकलित होऊन त्याची योग्य विल्हेवाट लागावी, यासाठी नागरिकांचेही संपूर्ण सहकार्य आवश्यक आहे. नागरिकांनी दररोज घंटागाडीतच कचरा टाकावा. रस्त्यावर अथवा इतरत्र कचरा टाकू नये. तसेच ओला व सुका कचरा स्वतंत्र साठवावा व स्वतंत्रपणेच जमा करावा, असे आवाहन नगरसेविका संध्याताई पवार यांनी प्रभागातील नागरिकांना केले आहे.

जो कचरा कुजून नष्ट होऊ शकतो त्याला ओला कचरा म्हटले जाते. याशिवाय उर्वरित सर्व प्रकारचा कचरा हा सुका कचरा असतो. ओला व सुका कचरा ओळखण्याची व त्याचे वर्गीकरण करण्याची ही साधी सोपी पद्धत आहे. घरात निर्माण होणाऱ्या आपल्या रोजच्या कचऱ्यामध्ये तीन ते पाच टक्के ओला कचरा असतो. ओल्या कचऱ्यातील घटक उघड्यावर फेकले गेल्याने माशा, डास, हवेचे प्रदूषण, जलप्रदूषण, रोगराई आदी गोष्टींना आपणच निमंत्रण देत आहोत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत कचरा घंटागाडीमध्येच टाकावा. ओला व सुका कचरा विलगीकरण करावे. विलगीकरण केल्यास कचऱ्याची संपूर्ण विल्हेवाट लागण्यासाठी उपयोग होईल. प्रभागात स्वच्छता रहावी, यासाठी सर्वांनीच स्वच्छता अभियान सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post