'या' कारणामुळे हिवाळ्यात वजन वाढते!


माय अहमदनगर वेब टीम - विशेषतः हिवाळ्यात आपले वजन वाढते. असा अंदाज बांधला जातो. कित्येकांना थंडीच्या दिवसात वाढत्या वजनावर कंट्रोल ठेवणे अवघड जाते. असे का होते? याबाबत एका रिसर्च मधून माहिती समोर आली आहे. त्याबाबत जाणून घेऊयात...

एका नव्या रिसर्चनुसार, हिवाळ्यात शरीराला कॅलरी स्टोर करून ठेवण्याची सवय असते, त्यामुळेच या दिवसात काही किलो वजन वाढते.
सनलाईट आणि उन कमी असल्याकारणाने आपल्या शरीरातील हार्मोन्समध्ये बदल होतो. शरीरातील पीनल ग्लॅंड अधिक प्रमाणात मेलाटोनिन रिलीज करू लागतं. हे एक स्लीप हार्मोन आहे. यामुळे हिवाळ्यात सीजनल अफेक्टिव डिसऑर्डर वाढू लागते आणि जास्त झोप येते. याकारणाने आपली शारीरिक हालचाल कमी होते आणि आहार जास्त घेतला जातो. त्याचा वजन वाढीस फायदा होतो.
हिवाळ्यात लेझी आवर्सचा काळ वाढतो. सर्वसामान्य दररोज साधारण 200 कॅलरी अधिक घेतात. यामुळे देखील वजन वाढू शकते.
हिवाळ्यात जास्तीत जास्त वेळ आपल्याला भूक नसतानाही काहीतरी गरम, गोड किंवा चटपटीत खाण्याची इच्छा होते. यालाच क्रेव्हिंग म्हणतात. यानेही वजन वाढते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post