तुम्ही फक्त निवडून द्या, पुढचे मी करतो ; खासदार विखे यांचे नगरकरांना आवाहन, काय म्हणाले एकदा पहाच...माय नगर वेब टीम 

अहमदनगर -

आपल्या मुलांच्या उज्वल भविष्यासाठी सुशिक्षित, उच्च शिक्षित असा लोकप्रतिनिधी निवडून दिला तर त्याची परतफेड ही विविध विकास कामातून होते एवढेच नाही तर पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी शाश्वत अशी कामे केली जातात त्यामुळे आपण सर्वांनी याचा विचार करण्याची गरज असल्याचे खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी सांगितले. 

केडगाव येथे आयोजित देवी मंदिर सुशोभिकरण शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. 

यावेळी व्यासपीठावर आ. संग्राम जगताप, श्री सचिन कोतकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना ते म्हणाले की अहमदनगरकरांनी लोकसभेत भरघोस मतदान दिले या मतदानाची परतफेड आपण नगर शहराच्या विविध विकास कामातून देत आहोत. १५ वर्षापासून रखडलेल्या उड्डाणपुलाचे काम केवळ १८ महिन्यात पूर्ण केले तसेच बहुचर्चित बायपास हा एक हजार कोटी रुपयांचा केवळ १८ महिन्यात सुरू केला. असे एक ना अनेक विकास कामे केवळ भूमिपूजन करून नाही तर प्रत्यक्षात लोकार्पण करून पूर्ण केले आहेत. सुशिक्षित लोकप्रतिनिधी  निवडून दिला की अनेक अडचणीत ही तो तुमची जबाबदारी घेवून विकास कामे पूर्ण करतो. एवढेच नाही तर तुम्ही सर्वांनी आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेला व्यक्ती हा खासदार म्हणून निवडून दिला असून त्याला कोणत्याही कामात कमिशन ची हाव नाही.परमेश्वर कृपेने आणि आपल्या आशीर्वादाने आम्हाला भरपूर असे आहे. त्यामुळे कोणत्याही कामात टक्केवारी घेत नाही पर्यायाने गुत्तेदाराकडून हा चांगलेच काम करून घेतो. आपल्या येणाऱ्या पिढीच्या भविष्यासाठी खासदार म्हणून जी जबाबदारी आपण माझ्यावर टाकली आहे त्यानुसार नगर शहरात २५ कोटी रुपयाचे अत्याधुनिक असे ग्रंथालय उभा करणार असून येत्या काही दिवसांत याचे भूमिपूजन होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 


आपल्या एका मतदानाचा परिणाम हा आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्यावर होणारा असून आपलं एक मत टाकताना सर्वांनी फक्त आपल्या पुढच्या पिढीकडे पाहूनच ते द्यावे असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील दोन टर्म मध्ये आपल्या देशाला कुठून कोठे नेले आज आपला देश महासत्ता देशांच्या यादीत अग्रस्थानी आहे, तो तसाच अधिकाधिक पुढे न्यायचा की पुन्हा अशा लोकांच्या ताब्यात द्यायचा याचा विचार आपण सर्वांनी करावा असे आवाहन त्यांनी केले. 


या कार्यक्रमास नगरसेवक यांच्या यांच्यासह महायुतीचे  पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post