नीलेश लंके प्रतिष्ठानतर्फे ‘आदर्श पुरस्कार’ जाहीर

 


राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात रविवारी सन्मान सोहळा

खा. नीलेश लंके यांची प्रमुख उपस्थिती

माय नगर वेब टीम 

पारनेर : नीलेश लंके प्रतिष्ठान व आपला मावळा सामाजिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना ‘आदर्श पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. पारनेर येथे आयोजित राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी सकाळी ९ वाजता विशेष कार्यक्रमात पुरस्कारांचे वितरण होणार आहे. या सोहळ्यास खासदार नीलेश लंके यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.




       पुरस्कारार्थींची निवड करण्यासाठी विविध तज्ज्ञ समित्यांची नियुक्ती करण्यात आली होती. समित्यांनी प्राप्त झालेल्या नामनिर्देशनांची छाननी करून अंतिम यादी जाहीर केली आहे. 

       ग्रामीण भागातील सकारात्मक कार्याला प्रोत्साहन देणे व विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्यांचा सन्मान करणे हा या पुरस्कारांचा मुख्य उद्देश आहे.

     विविध क्षेत्रांतील पुरस्कारार्थी पुढीलप्रमाणे आहेत :

सामाजिक कार्य :

डॉ. गिरीष कुलकर्णी (अहिल्यानगर), अभिषेक राजेंद्र दंडनाईक (श्रीगोंदा), तुकाराम बबन वाखारे (पानोली, ता. पारनेर), हरिहर गर्जे (पाथर्डी), बाळासाहेब नारायण चौधरी (अमरापूर, ता. शेवगाव).

आदर्श शेतकरी :

काशिनाथ रामभाऊ खरमाळे (भांडगाव, ता. पारनेर), ज्ञानदेव सखाराम हिरवे (पारगाव, ता. श्रीगोंदा), शशिकांत बोरुडे (खर्डे, पाथर्डी), किशोर रघुनाथ कोहकडे (बारगाव नांदूर, ता. राहुरी), अमोल रामदास जगताप (भांबोरा, ता. कर्जत), संदेश श्रीराम हजारे (जवळा, ता. जामखेड), नाथ मुरलीधर देशमुख (अकोळनेर, ता. नगर), कल्याणी कैलास मुरदारे (भगूर, ता. शेवगाव), सूर्यकांत विलास नेटके (सावेडी, नगर).

आदर्श उद्योजक :

      सचिन हरिभाऊ पाचपुते (काष्टी, ता. श्रीगोंदा), अख्तर अजित आत्तार (कुळधरण, ता. कर्जत), शोएब हफिजउद्दीन शेख (शेवगाव), राम सुधाकर पाथरकर (पाथर्डी), सावरमल रामेश्वर गुजर (सुपा, ता. पारनेर), दौलत शिंदे (नगर शहर).

उत्कृष्ट गोपालक / गोशाळा :

धनंजय खंडू पानमंद (म्हस्केवाडी, ता. पारनेर).

आदर्श शिक्षक :

विठ्ठल विलास शिंदे (श्रीगोंदा), मनिषा श्रीरंग रायकर (कर्जत), अनिता विठ्ठल पवार (जामखेड), आरिफ युसुफ बेग (पाथर्डी), कल्याण महादेव पोटभरे (शेवगाव), अनिता भागुजी खरमाळे (राहुरी), बंडू शिवाजी जपकर (नगर), ज्योती दत्तात्रय साबळे (पारनेर), शंकर भिमराज बारस्कर (नगर).

आदर्श बचत गट :

राधिका महिला स्वयंसहायता समूह (देवीभोयरे, ता. पारनेर).

आदर्श सरपंच :

संदीप विठ्ठल गाडेकर (पानोली, ता. पारनेर), श्रीकांत राजाराम डेरे (रेनवडी, ता. पारनेर), सुरेखा दत्तात्रय धुमाळ (मुंगुसगाव, ता. श्रीगोंदा), ज्योती ज्ञानदेव लष्कर (बहिरोबावाडी, ता. कर्जत), अश्विनी सागर कोल्हे (राजुरी, ता. जामखेड), ज्ञानेश्वरी राजेंद्र शिरसाठ (पिंपळगाव टप्पा, ता. पाथर्डी), आयोध्या शंकर काटे (आखेगाव, ता. शेवगाव), दीपक भाऊ मकासरे (कुक्कुढवेढा, ता. राहुरी), शरद खंडेराव पवार (चिचोंडी पाटील, ता. नगर), राजू आंबेकर (भोयरे खुर्द, ता. नगर).

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post