अमेरिकेच्या बाजारपेठेत नगरचे डाळींब! १४ टन डाळिंब अमेरिकेला निर्यात : खासदार नीलेश लंके यांची माहिती



माय नगर वेब टीम

अहिल्यानगर :     भारतीय डाळिंब आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये पोहचविण्याच्या ऐतिहासिक उपक्रमांतर्गत अहिल्यानगरमधील भगवा जातीचे १४ टन डाळिंब समुद्रमार्गे अमेरिकेच्या न्युर्यार्कमध्ये पोहचले असून अहिल्यानगरच्या भगव्याने आंतराष्ट्रीय बाजारपेठेत आपली मोहर उमटविली आहे. ताज्या फळांच्या निर्यातीचा हा एक महत्वपुर्ण टप्पा मानला जात असल्याचे खासदार नीलेश लंके यांनी दिली.

      ताज्या फळांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतेतील वाढती मागणी पाहता या निर्यातीमुळे भारतीय डाळिंब अमेरिकन बाजारपेठेत प्राधान्याने निवडले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सन २०२३ मध्ये अमेरिकेने भारताला डाळिंब निर्यातीसाठी बाजार प्रवेश दिल्यानंतर कृषी व प्रक्रिया केलेले अन्न, उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाने अमेरिकन कृषी विभागाचे प्राणी व वनस्पती आरोग्य तपासणी सेवा आणि  सोलापुर येथील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र यांच्या सहकार्याने डाळिंबाची हवाई मार्गे यशस्वी चाचणी पाठवणी केली होती. 

      कृषी व प्रक्रिया केलेले अन्न, उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण आणि राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र यांच्या सहकार्याने डाळींबाचे शेल्फ लाईफ ६० दिवसांपर्यंत वाढविण्यासाठी स्थिर चाचणी यशस्वी केल्यानंतर भारताने सन २०२४ च्या फेब्रुवारी महिन्यात नवी मुंबईतील महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ येथील किरणोत्सर्ग सुविधा केंद्रातून ४ हजार २०० बॉक्स म्हणजेच कर १२.६ टन डाळिंब समुद्रमार्गे यशस्वी प्रायोगिक पाठवणी करण्यात आली होती. 

     कृषी व प्रक्रिया केलेले अन्न, उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाने डिसेंबर २०२४ मध्ये प्री-क्लिअरन्स कार्यक्रमास प्रोत्साहन दिल्यामुळे भारतीय कृषी निर्यातदारांसाठी लॉजिस्टिक्स आणि नियामक अडथळे दूर होण्यास मदत झाली. 

अमेरिकन ग्राहक समाधानी

डाळिंबाच्या समुद्रमार्गे यशस्वी पाठवणीनंतर पाठविण्यात आलेले १४ टन वजनाचे ४ हजार ६२० डाळिंबाचे बॉक्स अमेरिकेच्या ईस्ट कोस्टवर मार्चच्या दुसऱ्या आठवडयात पोहचले. निर्यातीच्या पाच आठवडयात माल पोहचल्याने त्याची गुणवत्ता उत्कृष्ट असल्याचे नोंदविली गेले आणि न्यूर्यार्कमधील ग्राहकांनी त्यांच्या अप्रतिम देखाव्याने व स्वादिष्ट चवीने समाधान व्यक्त केले.  

आंब्याप्रमाणेच डाळिंबाचीही निर्यात वाढणार 

भारत सरकार भारतीय ताज्या फळांच्या जागतिक बाजापेठेसाठी सतत प्रोत्साहन देत आहे. कृषी व प्रक्रिया केलेले अन्न, उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाने आंबा व डाळिंब यांच्या निर्यातीसाठी प्री-क्लिअरन्स कार्यक्रमासाठी निधी उपलब्ध करून दिला  आहे. भारतीय शेतकऱ्यांना प्रीमियम आंतरराष्ट्रीय बाजारातून चांगला दर मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. भारतीय आंब्याची वार्षिक निर्यात सुमारे ३ हजार ५०० टन इतकी झाली आहे. भविष्यात डाळिंबही त्याच पध्दतीने मोठया प्रमाणार निर्यात होईल अशी अपेक्षा आहे. 

अभिषेक देव 

अध्यक्ष, कृषी व प्रक्रिया केलेले अन्न, उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण

थेट शेतकऱ्यांना लाभ 

ही निर्यात मुंबईस्थित के.बे. एक्स्पोर्टस या आघाडीच्या फळ व भाजीपाला निर्यातदार संस्थदवारे करण्यात आली असून ही संस्था कृषी व प्रक्रिया केलेले अन्न, उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाकडे नोंदणीकृत आहे. या निर्यातीमधीली डाळिंब थेट के.बे. एक्स्पोर्टसच्या शेतांमधून संकलित करण्यात आले हाते. त्यामुळे त्याचा लाभ थेट शेतकरी बांधवांपर्यंत पोहचला. 

दर्जेदार डाळिंब देण्यासाठी कटीबद्ध

कृषी व प्रक्रिया केलेले अन्न, उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाने भारतीय डाळिंबाची निर्यात अमेरिकेला सुलभ केली आहे. बाजारपेठेत प्रवेश मिळवून देणे, निर्यात प्रोटोकॉल सेट करणे या सर्व बाबतीत कृषी व प्रक्रिया केलेले अन्न, उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाने मोलाची भूमिका बजावली आहे. आम्ही दर्जेदार डाळींब देण्यासाठी कटीबद्ध आहोत. भविष्यातही तसेच प्रयत्न करणार आहोत.

कौशल खाखर मुख्य कार्यकारी अधिकारी

के.बे.एक्स्पोर्टस 

ग्राहकांमध्ये भगवा लोकप्रिय 

भगवा डाळिंब त्याच्या गडद लाल रंगासाठी, समृध्द स्वादासाठी व उच्च पोषणमुल्यांसाठी प्रसिध्द आहे. अँब्टीऑक्सिडंटस व महत्वपुर्ण तत्वांनी परिपूर्ण असल्याने ते आरोग्यदृष्टया जागरूक ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहे. उच्च दर्जाचे फळ  व सातत्यपूर्ण विपणन उपक्रम यांच्या जोरावर भारतीय डाळिंब लवकरच अमेरिकन ग्राहकांच्या पसंतीस उतरेल आणि त्यांच्या किरकोळ विक्री स्टोअरमध्ये आपली जागा निश्चित करेल. 

गौरवास्पद ! 

अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ही बाब गौरवास्पद आहे. कृषी व प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात प्राधिकरणाच्या माध्यमातून अहिल्यानगर येथून प्रथमच १४ टन भगवा डाळिंब अमेरिकेस यशस्वीरित्या निर्यात झाले. हे शेतक-यांच्या मेहनतीचे फळ असून भारतीय फळांच्या दर्जाचा जागतिक स्तरावर स्वीकार झाल्याचे ते उदाहरण आहे. भारत सरकारच्या प्रयत्नामुळे तसेच विविध संस्था, शेतकरी, निर्यातदार यांच्या एकत्रीत सहकार्यातून हे शक्य झाले आहे. ही बाब केवळ अहिल्यानगर जिल्ह्यासाठी नव्हे तर संपूर्ण भारतासाठी अभिमानाची आहे. भविष्यात आपल्या भागातील दर्जेदार उत्पादनांचा जागतिक बाजारपेठांमध्ये मोठया प्रमाणावर विस्तार व्हावा यासाठी आपण सर्वांनी एकत्रीतपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे. अशा ऐतिहासिक टप्प्याचा भाग होण्याचा सन्मान आपल्याला मिळाला याचा मला आनंद आहे.मी सर्व शेतकरी बंधू-भगिनींना निर्यातदारांना व सबंधित संस्थांना मनःपुर्वक शुभेच्छा देतो.   

खासदार नीलेश लंके

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post