श्रीगोंद्यातील कोळगाव गट-गणात नव्या चेहऱ्यांचे वादळ; कवडे, झरेकर, इथापे उतरणार मैदानात



पारंपरिक वर्चस्वाला आव्हान, छोट्या गावांचा बुलंद आवाज!

विकास चोभे : 

जिल्हा परिषद गट आणि गणातील आरक्षण जाहीर झाल्याने आता गावोगावचे राजकारण तापायला सुरुवात झाली आहे.  त्यातच आता निवडणुकीसाठी तरुणाई सरसावली आहे. कोळगाव गट सर्वसाधारण जागेसाठी असल्यामुळे येथे कोरेगावचे सरपंच ज्ञानेश्वर कवडे यांच्या नावाची जोरदार चर्चा रंगली आहे. तरुणांचा मोठा संच त्यांच्या पाठीशी आहे. तसेच कोळगाव गण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी राखीव झाल्याने येथे चिखलीचे युवा भूषण, शिवमुद्रा ग्रुपचे अध्यक्ष विशाल झरेकर यांच्या पत्नी शुभांगी ताई विशाल झरेकर या निवडणूकीच्या रींगणात उतरणार असल्याची माहिती आहे. 






कोळगाव गट गणातील स्थानिक राजकारणात आता तरुण पिढीने थेट झंझावात उभा केला आहे. वर्षानुवर्षे मोठ्या गावांचा राजकीय दबदबा आणि छोट्या गावांवरील अन्याय संपवण्यासाठी चिखली, कोरेगाव, घुटेवाडी, सुरेगाव, मुंगसगाव, उखलगाव या गावातील तरुणांनी एकत्रित झेंडा उचलला आहे.

💥 “मोठ्या गावांनी घेतलेली मक्तेदारी संपणार!”

कोळगाव गणातील गेल्या काही निवडणुकांमध्ये मोठ्या गावांचे उमेदवारच अग्रस्थानी राहिले, छोट्या गावांना उमेदवारीची संधीच मिळाली नाही. ही परिस्थिती आता बदलणार आहे. 

या निवडणुकीत कोळगाव गणात आरक्षण महिला (OBC) आरक्षण गेल्याने, श्री. झरेकर यांनी पत्नी सौ. शुभांगी ताई विशाल झरेकर यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. जनतेतून याला जबरदस्त प्रतिसाद मिळत असून, “ह्या वेळेस कोळगाव गणात बदल अटळ आहे!” असे मतदार खुलेपणाने म्हणू लागले आहेत.



🔱 नवे नेतृत्व – तरुण पिढीचा नवा चेहरा

श्रीगोंदा तालुक्यातील  कोरेगावचे सरपंच ज्ञानेश्वर कवडे पाटील आणि मुंगसगावचे युवा नेता सुजित (भैय्या) इथापे, चिखलीचे विशाल झरेकर,

हे तिन्ही नावं आता कोळगाव गट आणि गणातील चर्चेचा केंद्रबिंदू ठरले आहेत.

कवडे पाटील – प्रामाणिक कारभार आणि ग्रामविकासाचे पर्याय.

इथापे – तरुणाईचा निर्धार आणि झोकून देणारे नेतृत्व.

झरेकर – समाजकारण आणि संघटनशक्तीचे प्रतीक.

या तिन्ही नेतृत्वांची एकत्रित ताकद मोठ्या गावांच्या राजकारणाला थेट आव्हान देणारी ठरत आहे.

⚡ “पक्ष नाही, परिवर्तन!”

कोळगाव गट आणि गणातील तरुणांनी या वेळी स्पष्ट भूमिका घेतली आहे – “पक्ष अपक्ष काहीही असो, पण संधी सर्वांना समान मिळाली पाहिजे!”

सर्व गावातील युवा प्रतिष्ठान, मित्रमंडळी, समाजातील विविध घटक, महिला वर्ग, शेतकरी आणि ग्रामस्थ या नव्या नेतृत्वाच्या पाठीशी ठाम उभे राहिले आहेत.



0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post