उत्सव स्रीत्वाचा' कार्यक्रम बहिरवाडी येथे संपन्न ग्रामपंचायत व रोटरी क्लबचा पुढाकार

 माय अहमदनगर वेब टीम



नगर तालुका-  नगर तालुक्यातील बहिरवाडी ग्रामपंचायत व रोटरी क्लब ऑफ अहमदनगर इंटेग्रिटी यांच्या संयुक्त विद्यमाने 'उत्सव स्रीत्वाचा' कार्यक्रमाचे आयोजन शनिवार दि.११ मार्च रोजी करण्यात आले होते. यावेळी पार पडलेल्या विविध स्पर्धांमधून मिसेस बहिरवाडी हा किताब शितल मधुसूदन दारकुंडे यांनी मिळवला.

          बहिरवाडी ग्रामपंचायत व रोटरी क्लब आयोजित उत्सव स्रीत्वाचा कार्यक्रम रोटरी क्लबचे अध्यक्ष रवी डीक्रूज, सचिव चंदना गांधी, सरपंच अंजना येवले, जेऊर सरपंच ज्योती तोडमल, भाजप तालुका उपाध्यक्ष राजू दारकुंडे, यशश्री स्कूल प्राचार्या सौ. मनीषा पवार, डॉ. अर्चना कर्डिले, डॉ. दिपाली वाबळे, ग्रामविकास अधिकारी सविता लांडे, तलाठी सरिता मुंडे, कृषी सहाय्यक धनराज गुंड, संजय येवले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

          यावेळी महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. उखाणे, प्रश्नावली, योगसाधना, डिजिटल सहेली याबरोबरच मनोरंजनात्मक खेळ खेळविण्यात आले. त्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवून शितल मधुसूदन दारकुंडे यांनी मिसेस बहिरवाडी हा किताब पटकाविला. तर द्वितीय प्रिया प्रवीण दारकुंडे, तृतीय क्रमांक गीतांजली राजेंद्र काळे यांनी मिळवला. यावेळी गावातील महिलांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे स्पर्धेचा भाग नोंदवला होता.



        याप्रसंगी बोलताना सरपंच सौ. अंजना येवले यांनी सांगितले की,  ग्रामीण भागातील महिला आज सर्वच क्षेत्रात गरुड झेप घेत आहेत. चूल आणि मूल या संकल्पनेतून बाहेर पडून अनेक महिलांनी देशाचे नाव मोठे केले आहे. ग्रामीण भागातील महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी उत्सव स्रीत्वाचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सौ. येवले यांनी दिली.

        याप्रसंगी प्रकल्प प्रमुख शुभाश्री पटनाईक, निकिता रसाळ, निखिल कुलकर्णी, सुयोग झंवर, रफिक मुन्सी, दिनकर टेमकर, मच्छिंद्र काळे, कांतीलाल पाटोळे, सावळेराम चव्हाण, संतुकनाथ विद्यालय शिक्षिका, प्राथमिक शाळा शिक्षिका, अंगणवाडी सेविका यांच्यासह बहिरवाडी परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post