नगर : जिल्ह्यात संघटित गुन्हेगारी करण्यास कुप्रसिद्ध असलेल्या आकाश डाके टोळीविरूद्ध मोक्का कायद्याअंतर्गत विशेष मोक्का न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
गांधीनगर व बोल्हेगाव परिसरातील आकाश भाऊसाहेब डाके, गणेश भगवान कुर्हाडे, सागर भाऊसाहेब डाके, बाळासाहेब नाना वाघमारे यांच्यासह किरण सोमना मातंग अशा पाच जणांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली होती. नगर शहरातील बोल्हेगाव परिसरातील महिलांच्या दोन गटांमध्ये किरकोळ स्वरूपाचा वाद झाला होता. त्याची फिर्याद दाखल करण्यासाठी तोफखाना पोलिस ठाण्यात आल्यानंतर पोलिस ठाण्याच्या आवारातच दोन गट एकमेकांसमोर भिडले. त्यापैकी एका गटाने चाकूने व कोयत्याने दोघांवर हल्ला चढवला. याप्रकरणी पोलिसांनी सचिन निकम यांचे फिर्यादी वरून डाके टोळीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
टोळी विरुद्ध मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करणे करिता पोलिस उपमहानिरीक्षक यांचेकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता. सदर प्रस्तावास मंजुरी मिळाल्यानंतर पुढील तपास श्रीरामपूरचे उपअधीक्षक संदीप मिटके यांचेकडे वर्ग करण्यात आला होता. उपअधीक्षक मिटके यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.
Post a Comment