Cyber Crime : ऑनलाईन साईटवरुन टीव्हीचा रिमोट मागवला, तरुणाला बसला ९९ हजार ९९९ रुपयांचा फटका

 गेल्या काही दिवसांपासून राज्यात सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होते आहे. हे प्रकार आता राज्याच्या ग्रामीण भागापर्यंत पोहचले आहेत. बीड जिल्ह्यात एका तरुणाला ऑनलाईन वेबसाईटवरुन टीव्हीचा रिमोट मागवणं चांगलंच महागात पडलं आहे. भामट्यांनी या तरुणाला गंडवत त्याच्या खात्यातले ९९ हजार ९९९ रुपये उकळले आहेत.


बीड शहरात आदित्य फार्मसी कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या तरुणाने टीव्हीचा रिमोट ऑनलाईन वेबसाईटवरुन मागवला. तेलगावचा रहिवासी असलेल्या आकाश म्हस्केने रिमोटची ऑर्डर केल्यानंतर ७ दिवसांत त्याला रिमोट मिळणं अपेक्षित होतं. परंतू रिमोट न मिळाल्यामुळे आकाशने कस्टमर केअरला फोन केला आणि तो इथेच भामट्यांच्या जाळ्यात अडकला.


कस्टमर केअर मधून बोलत असलेल्या भामट्याने तुमच्या रिमोटबद्दल १५ तारखेच्या आत फोन येईल असं सांगितलं. यानुसार १३ तारखेला दुपारी आकाशला त्याच्या मोबाईलवर एक फोन आला ज्यात त्याला त्याने ऑर्डर केलेल्या रिमोटबद्दल विचारणा करण्यात आली. समोरील व्यक्तीने आकाशला एका नंबरवर QR कोड पाठवायला सांगितला. याचसोबत आकाशच्या खात्यातून ५ रुपये एका लिंकवर पाठण्यासही सांगितलं. आकाशने या लिंकवर क्लिक करुन पाच रुपये पाठल्यानंतर त्याला फोनवर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तुमचं पार्सल येऊन जाईल असं समोरच्या व्यक्तीने सांगितलं.३०० रुपयांची थाळी पडली लाखाला, सोशल मीडियावरील जाहीरातीला भुलून बसला फटका

यानंतर काही मिनीटांनीच आकाशच्या मोबाईलवर तेलगाव येथील त्याच्या बँक ऑफ बडोद्याच्या शाखेतील ९९ हजार ९९९ रुपये Withdrawal झाल्याचा मेसेज आला. यानंतर आकाशने तात्काळ बीड पोलिसांच्या सायबर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.


बीड जिल्ह्यात १ जानेवारी ते नोव्हेंबर या अकरा महिन्यांच्या कालावधीत १०१ सायबर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांत ऑनलाईन वेबसाईटद्वारे ओटीपी मागवून लोकांना गंडा घालण्याचं प्रमाण वाढत असल्याचं समोर येतंय.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post