सोमय्यावरील कारवाईचा मुख्यमंत्री कार्यालयाचा संबंध नाही, राऊत यांची माहिती


मुंबई | भाजपा नेते किरीट सोमय्या (kirit somaiya)यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईशी मुख्यमंत्री कार्यालयाचा कोणताही संबंध नाही. ही कारवाई गृहमंत्रालयाने केली आहे, असं मोठं विधान शिवसेना(shiv sena) नेते संजय राऊत (sanjay raut)यांनी केलं आहे. राऊत यांनी एकप्रकारे सोमय्यांवरील कारवाईचं खापर राष्ट्रवादीवर (ncp)फोडल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत.

संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधत किरीट सोमय्यांवरील कारवाईशी मुख्यमंत्री कार्यालयाचा संबंध नसल्याचं वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले “आरोप करणाऱ्यांवर काल जी काही कारवाई झाली ती गृहमंत्रालयाने केली आहे. त्यामध्ये आकस आणि सूड या शब्दांचा वापर करु नये. मी पूर्ण माहिती घेतली असून गृहमंत्रालयाला कायदा आणि सुव्यवस्थेबाबत काही प्रश्न निर्माण होईल असं वाटलं. त्यातून ही कारवाई झाली असून यासंबंधी मुख्यमंत्र्यांवर आरोपी करण्याची गरज नाही. मुख्यमंत्री अशा लहान गोष्टीत पडत नाहीत. कोणी असे खोटे आरोप केले तर आमच्या सरकारला भोकं पडत नाहीत”

केंद्रीय तपास दबाव आणून त्यांची संपत्ती जप्त करण्याची धमकी दाखवून राज्यात काही उलथापालथ करता येईल असं त्यांना वाटत असेल तर ते भ्रमात आहेत. आम्ही परिस्थितीचा सामना करू. आम्ही संकटाला सामोरे जाऊ, आम्ही संघर्ष करू. हसन मुश्रीफ यांनी आव्हान स्वीकारल्याने संघर्ष निर्माण झाला आहे. हे सरकार डरपोक नाही. आम्ही ठाकरे-पवारांच्या नेतृत्वात लढाई सुरूच ठेवू. आमच्यावर किती हल्ला करा, पाठित खंजीर खुपसा आम्ही झुकणार नाही, असं सांगतानाच केंद्रात अनेक मंत्री आहेत. त्यांच्यावर आरोप भाजपने केले होते. आज ते केंद्रात मंत्री आहेत. राज्यातही अनेक नेत्यांवर आरोप केले. त्यांना भाजपमध्ये घेतलं. ते हरिश्चंद्राची औलाद झाली. अनेकांचे नावे सांगू शकतो, असं ते म्हणाले.

काय आहे प्रकरण

भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप केलेत. त्यासंदर्भात ते कोल्हापूरला जाऊन पत्रकार परिषद घेणार होते. परंतु कोल्हापूरला पोहचण्यापुर्वीच किरीट सोमय्या यांना साताऱ्यातील कराड रेल्वे स्थानकावरुन पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले. पहाटे 4.30 च्या सुमारास पोलिसांनी कराडमध्ये त्यांना ताब्यात घेतलं. कोल्हापूर आणि सातारा पोलिसांनी (Kolhapur and Satara Police)ही संयुक्तरित्या कारवाई केली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post