शनिशिंगणापूर देवस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी जी.के.दरंदले शनिशिंगणापूर | श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर येथील देवस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी जी. के.दरंदले यांची तर उप कार्यकारी अधिकारी म्हणून तांत्रिक विभागाचे नितीन शेटे यांची नियुक्ती करण्यात आली, अशी माहिती अध्यक्ष भागवत बानकर यांनी दिली.रिक्त असलेल्या दोन्ही पदासाठी मुलाखती घेऊन ही निवड झाल्याचे घोषित केले.

रिक्त असलेल्या दोन्ही पदासाठी मुलाखती घेऊन ही निवड झाल्याचे घोषित केले.

दरंदले यांनी २४ वर्षात सहा वर्षांहून अधिक काळ सहायक कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. शेटे यांनीही सहा वर्षे तांत्रिक अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. या नूतन अधिकाऱ्यांचा सन्मान देवस्थानच्या वतीने करण्यात आला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post