लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला पळविले; आरोपीला अटक

 


सुपा | सुपा पोलिस स्टेशन हद्दीत एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवत पळुन नेले होते. सुपा पोलिसांनी तत्परता दाखवत बारा तासात अरोपीच्या मुसक्या आवळल्या आहे.

याबाबत सुपा पोलिसांनी दिलेल्या माहितीत म्हटले आहे ,शनिवार दिनांक १८ सप्टेंबर २०२१ रोजी सुपा पोलिस स्टेशन हद्दीत एक आल्पवईन मुलगी लग्नाचे फुश लावून पळून नेली आहे अशी फिर्याद आली. यावेळी सुपा पोलिसांनी वैभव बाळासाहेब नांदखिले रा,वांघुडें खुर्द यांच्या विरुध सुपा पोलिसांनी गुन्हा दाखल केला व ताबडतोब तपासाचे चक्रे फिरवली मिळालेली माहिती व मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी आरोपीस पुणे कामशेत येथे पकडले.

या आरोपीला सुपा पोलिसांनी मोठ्या शिताफिने बारा तासांच्या आत पकडले असून पुढील तपास पी. आय गोकावे करीत आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post