एयरोस्पेस कंपनीनं 9 वर्षांनी रचला इतिहास, पहिल्यांदाच सामान्य नागरिक झेपावले अंतराळात



 नवी दिल्ली | एलन मस्क यांची अमेरिकन एयरोस्पेस कंपनी स्पेसएक्सनं 9 वर्षांनंतर अखेर इतिहास रचला. अमेरिकेनं 9 वर्षात पहिल्यांदाच आपल्या भूमीवरुन अंतराळात अंतराळवीर पाठवले होते. बुधवारी रात्री ‘इन्स्पिरेशन -4’ मिशनला जगातील पहिल्या ऑल सिव्हिलियन क्रूसह अंतराळात लाँच करुन इतिहास रचला आहे. कंपनीनं भारतीय वेळेनुसार, सकाळी 5 वाजून 32 मिनिटांनी पहिल्यांदा 4 सर्वसामान्यांना अंतराळात पाठवलं.

‘इन्स्पिरेशन -4’ या मोहिमेअंतर्गत कंपनीतर्फे अंतराळवीर नाही तर सामान्य नागरिकांना अंतराळात पाठविण्यात आलं. चार सामान्य नागरिकांना घेऊन जाणारे स्पेसएक्सचे पहिलं यान बुधवारी रात्री अंतराळात रवाना झालं. हे चार लोक 3 दिवसांपर्यंत 575 किमीवर पृथ्वीच्या कक्षेत राहतील.

या मोहिमेद्वारे अंतराळ पर्यटनास प्रोत्साहन मिळणार आहे. फ्लोरिडाच्या केनडी स्पेस रिसर्च सेंटर येथून स्पेसएक्स यानाने चौघांना घेऊन अवकाशात भरारी घेतली. स्पेसएक्सचे संस्थापक एलन मस्क यांची अंतराळ पर्यटनाच्या जगात ही पहिलीच एंट्री आहे. यापूर्वी, ब्लू ओरिजिन आणि व्हर्जिन स्पेस शिपनेही खासगी अवकाश पर्यटन सुरू केलं.

दरम्यान, हे मिशन केवळ सरकार पुरस्कृत अंतराळवीरांपेक्षा सामान्य लोकांसाठी मानवी अंतराळ उड्डाणाच्या नवीन युगाची सुरुवात करेल अशी अपेक्षा आहे. सध्या आंतराळाची आवड असणाऱ्या लोकांसाठी ही बातमी आनंदाची असून हा क्षण महत्वाचा आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post