‘बिग बाॅस’ होस्ट करण्यासाठी सलमान खानने घेतले ‘इतके’ कोटी! मुंबई | ओटीटी प्लॅटफाॅर्मवरील ‘बिग बाॅस 14’ संपत आल्यानंतर आता चाहत्यांना ‘बिग बाॅस 15’ची उत्सुक्ता लागली आहे. ‘बिग बाॅस’ म्हटलं की प्रसिद्ध अभिनेता सलमान खान आलाच. त्याच्या शिवाय बिग बाॅस शो होणं कठीणच. अशातच आता ‘बिग बाॅस 15’ होस्ट करताना सलमान पुन्हा लोकांच्या समोर येईल.

गेल्या अनेक सिझन्सपासून सलमान बिग बाॅस होस्ट करत आला आहे. अर्थातच त्याने आतापर्यंत 14 शो होस्ट केले आहेत. यादरम्यान, शो होस्ट करण्यासाठी तो किती रक्कम घेतो याकडे लोकांच्या आणि त्याच्या चाहत्यांच्या नजरा लागून असतात. अशातच आता बिग बाॅस 15 साठी सलमानने 350 कोटी घेतल्याचं वृत्त आहे.

बिग बाॅस सिझन 15 साठी सलमान एकूण 350 कोटी घेणार आहे. येत्या ऑक्टोंबरमध्ये हा सिझन सुरु होणार असून 14 आठवडे हा शो चालणार आहे. यात सलमानला प्रत्येक आठवड्यासाठी 13 कोटी महणजे एका एपिसोडसाठी अडीच कोटी मिळणार आहेत. या किंमतीत सलमान 1 कोटीच्या 350 लक्झरी रेंज रोव्हर कार खरेदी करु शकतो.

दरम्यान, यावेळी या शोची थिम जंगलची असणार असल्याची चर्चा आहे.  सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात अडकलेली अभिनेत्री रिया चक्रवर्तीपासून तारक मेहता फेम अभिनेत्री निधी भानूशाली पर्यंत कोण-कोण या शो मध्ये सहभागी होणार, त्यांची नावं समोर येत आहेत. मात्र अजूनही स्पर्धकांची यादी समोर आलेली नाही.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post