मुलाच्या मारेकऱ्यांना अटक करा ; आईने घेतली ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची भेटमाय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर - काही दिवसापुर्वी वाळकी (ता. नगर) येथे ओमकार भालसिंग याच्यावर खूनी हल्ला झाला होता. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणातील मुख्य आरोपीला तात्काळ अटक होण्यासाठी मयत मुलाची आई लता बाबासाहेब भालसिंग यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन निवेदन दिले.

वाळकी (ता. नगर) येथील लताबाई बाबासाहेब भालसिंग यांचा मुलगा ओंकार बाबासाहेब भालसिंग (वय 21) याला काही दिवसांपूर्वी विश्‍वजीत रमेश कासार यांने बळजबरीने गाडीत घालून, लोखंडी दांडक्याने मारहाण केली. यामध्ये ओमकार गंभीर जखमी झाला होता. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. सदर प्रकरणी आरोपी असलेला विश्‍वजीत रमेश कासार याच्यावर नगर तालुका पोलीस स्टेशन मध्ये भा.द.वि कलम 302 नुसार खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. मात्र अद्यापि आरोपी फरार असून, पोलीसांनी त्याला अटक केलेली नाही. तरी लवकरात लवकर मुख्य आरोपीला अटक करण्यात यावी अशी मागणी मयत मुलाच्या आईने केली आहे. पोलीस अधिक्षक कार्यालयात निवेदन देऊन देखील न्याय मिळत नसल्याने सदर महिलेने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना निवेदन देऊन सदर प्रकरणी चर्चा केली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post