बाळ बोठेंचा जामीन अर्ज फेटाळलामाय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर- रेखा जरे खून प्रकरणात पत्रकार बाळ बोठे याचा जामीन अर्ज न्यायालयाने बुधवारी (दि.16) नामंजूर केला आहे. 

रेखा जरे खून प्रकरणात बोठे याचे नाव निष्पन्न झाल्यापासून तो फरार असून, बोठे याला जामीन मिळण्यासाठी न्यायालयात बोठे याच्या वकीलाने अर्ज दाखल केला होता. या जामीन अर्जावर सुनावली झाली, या दरम्यान बोठे याचा जामीन अर्ज न्यायालयाने नामंजूर केला.

यापूर्वीच या खूनप्रकरणी आरोपी फिरोज राजू शेख (वय 26 रा. संक्रापूर आंबी ता. राहुरी), ज्ञानेश्वर शिवाजी शिंदे (वय 24 रा. कडीत फत्तेबाद ता. श्रीरामपूर), आदित्य सुधाकर चोळके (वय 25 रा. तिसगाव फाटा कोल्हार ता. राहता), सागर उत्तम भिंगारदिवे (वय 31, रा. शास्त्रीनगर केडगाव अहमदनगर), ऋषिकेश उर्फ टम्या वसंत पवार (वय 23, रा. प्रवरानगर ता. राहाता) आदी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिस तपासात निष्पन्न झाल्यापासून बाळासाहेब बोठे हा फरार असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. याप्रकरणी सुपा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post