क्रीडा श्रीशांतनंतर ‘या’ खेळाडूला करायचंय क्रिकेटमध्ये पुनरागमन


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०१३ मधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळलेला अंकित चव्हाण क्रिकेटच्या पुनरागमनाविषयी इच्छुक आहे. अंकित चव्हाण सध्या आजीवन बंदीचा सामना करत आहे. त्याने बीसीसीआय आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनला (एमसीए) पत्र लिहून ही शिक्षा कमी करून सात वर्षे करण्याची विनंती केली आहे.

अंकित म्हणाला, ‘मी या आधारावर बीसीसीआयला विनंती करतो की जर श्रीशांतच्या बंदीचा पुनर्विचार होऊ शकतो, तर कृपया माझ्या बंदीवरही पुनर्विचार करा. मला बीसीसीआयकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून मला एमसीएला पत्र लिहावे लागत आहे. मी एमसीएला विनंती करतो की माझे प्रकरण बीसीसीआयकडे सादर करावे जेणेकरून माझ्या बंदीवर पुन्हा विचार केला जाईल.‘

२०१३ मध्ये बीसीसीआयच्या शिस्त समितीने राजस्थान रॉयल्सच्या तीन खेळाडूंवर (एस. श्रीशांत, अंकित चव्हाण आणि अजित चंडिला) आजीवन बंदी घातली. २०१५ मध्ये दिल्लीतील न्यायालयाने या खेळाडूंवरील आरोप काढून टाकले. तर, गेल्या वर्षी बीसीसीआय लोकपाल डीके जैन यांनी श्रीशांतवरची आजीवन बंदी सात वर्षांवर आणली. श्रीशांतला पुन्हा स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतण्याची संधी आहे. आता ३४ वर्षीय अंकितनेही क्रिकेटमधील पुनरागमनाविषयी उत्सुकता दाखवली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post