तुमची रास कोणती? कोणत्या राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस लाभदायक ठरेल? आज भाग्य तुम्हाला किती साथ देईल? कोणत्या राशीच्या व्यक्तींनी काय काळजी घ्यावी? मीन राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस कसा जाईल ?

 


माय अहमदनगर वेब टीम

मंगळवार, १७ नोव्हेंबर २०२०. चंद्र दुपारनंतर गुरुचे स्वामीत्व असलेल्या धनु राशीत प्रवेश करेल. चंद्राच्या या प्रवेशाचा मेष आणि मिथुन राशीच्या व्यक्तींना सर्वाधिक लाभ मिळतील. तुमची रास कोणती? तुमच्यासाठी कसा असेल आजचा दिवस? कोणत्या राशीच्या व्यक्तींना काय लाभ मिळतील? जाणून घेऊया..

मेष : छोट्या प्रवासाचा लाभ घडेल. आजच्या दिवसात कोणतेही कर्जाऊ व्यवहार करू नयेत. शासनाकडून लाभ मिळण्याची शक्यता. जुन्या मित्रांचे संपूर्ण सहकार्य लाभेल. नवीन ओळखी होतील. जनसंपर्कात भर पडेल. जोडीदाराकडून मोलाचे सहकार्य लाभेल. दिवसाचा उत्तरार्ध उत्तम असेल.

वृषभ : प्रतिस्पध्यावर आपले वर्चस्व राहील. दिनक्रम अतिशय व्यस्त राहण्याची शक्यता. धावपळ होईल. सावधगिरी बाळगून व्यवहार करावेत. निर्णय क्षमतेचा पूरेपूर उपयोग होईल. प्रलंबित कामे मार्गी लागतील. चांगल्या गोष्टीसाठी पैसे खर्च झाल्याचा भविष्यात लाभ मिळेल. दिवसाच्या उत्तरार्धात एखाद्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकेल.

मिथुन : व्यवसायामध्ये नवीन गोष्टींना प्राधान्य मिळेल. अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवावे. आजचा दिवस काहीसा कष्टकारक ठरेल. दिवसाच्या उत्तरार्धात परिस्थिती अनुकूल होईल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. गरजूंना मदत केल्याचे समाधान मिळेल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. मुलांकडून शुभवार्ता मिळतील.

साप्ताहिक राशीभविष्य - दि. १५ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर २०२०

कर्क : आपल्या घरासाठी मोठी खरेदी कराल. भाग्याची उत्तम साथ लाभेल. परिश्रमाचे चीज होईल. मुलांप्रति आपला असलेला विश्वास अधिक मजबूत होईल. कुटुंबातील सदस्यांकडून विशेष सहयोग प्राप्त होऊ शकतील. मौज-मजेसाठी पैसे खर्च होतील. हितशत्रू, विरोधक परास्त होतील. पालकांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.

सिंह : नवीन शिक्षणासाठी उत्तम कालावधी. संमिश्र घटनांचा दिवस. एखाद्या घटनेमुळे मन अशांत होईल. आई-वडिलांच्या सहयोग, सहकार्य आणि पाठिंब्यामुळे दिवसाचा उत्तरार्ध आपल्यासाठी अनुकूल होईल. सासरच्या मंडळींशी मतभेद होऊ शकतील. बोलताना तारतम्य बाळगावे. नेत्रविकार त्रस्त करू शकतील. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.

कन्या : पटत नसलेल्या मुद्याला खरमरीत उत्तर द्या. धाडस आणि साहस वृद्धिंगत होईल. सुरुवातीला कठीण वाटणारी कामे सुलभतेने पार पडतील. पालकांचा सहयोग लाभेल. अनावश्यक खर्चाचे योग. व्यापारी वर्गाला धनलाभाचे संकेत. पत्नीच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. दिवसाचा उत्तरार्ध उत्तम असेल.

तुळ : पैशाची गुंतवणूक योग्य पद्धतीने करा. आजचा दिवस शुभकारक असेल. कार्यक्षेत्रातील अधिकारात वाढ होईल. परोपकार करण्यावर भर राहील. गुरुप्रति आदर आणि निष्ठाभाव कायम ठेवावा. गुरुजनांचे आशीर्वाद लाभदायक ठरतील. कौटुंबिक वातावरण आनंदी आणि उत्साही असेल. नवीन कार्यासाठी गुंतवणूक करण्यास अनुकूल काळ.

वृश्चिक : दिवसाची सुरुवात समाधानी होईल. मात्र, दिवसभरात काही ना काही समस्यांचा सामना करावा लागू शकेल. व्यापार वृद्धी, विस्तारासाठी सुरू असलेले प्रयत्न आणखी वाढवावे लागतील. अपेक्षित परिणाम साध्य होतीलच, असे नाही. धैर्य आणि प्रतिभा यांमुळे हितशत्रूंवर विजय मिळवाल. शक्यतो वादाचे प्रसंग कटाक्षाने टाळावेत.

धनु : संभ्रमावस्थेत कोणाला वचन देऊ नका. ज्ञानात भर पडेल. दानधर्म, परोपकार करण्यावर भर द्याल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. धार्मिक कार्याच्या आयोजनाबाबत चर्चा घडतील. आर्थिक स्थिती सुधारेल. भाग्याची भक्कम साथ लाभेल. दिवसाच्या उत्तरार्धात पोटाचे विकार त्रस्त करू शकतील. आहारावर नियंत्रण ठेवावे. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.

मकर : जुन्या ओळखीच्या लोकांच्या पुन्हा भेटी गाठी होतील. एखादी मौल्यवान वस्तू मिळू शकेल. अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवणे हिताचे ठरेल. काही खर्च अचानक करावे लागू शकतील. सासरच्या मंडळींकडून मान, सन्मान प्राप्त होऊ शकतील. प्रलंबित कामे मार्गी लावाल. गुंतवणुकीसाठी अनुकूल कालावधी. भविष्यात लाभ मिळतील.

कुंभ : आपल्या मागणीनुसार समोरच्याची साथ मिळेल. सारासार विचार करून निर्णय घेण्याचा दिवस. खर्च मर्यादित ठेवावेत. भौतिक सुख वृद्धिंगत होईल. दिवसाच्या उत्तरार्धात छोटे प्रवास संभवतात. यातून काही ना काही लाभ मिळू शकेल. जुन्या मित्रांशी झालेल्या संपर्कामुळे मन प्रसन्न होईल. मानसिक शांतता लाभेल.

मीन : व्यवसायात मोठी वृद्धी घडेल. प्रलंबित कामे मार्गी लागतील. एखाद्या वादाचे निरसन होऊ शकेल. जनसंपर्कात भर पडेल. सामाजिक मान, सन्मान प्राप्त होऊ शकतील. मनोबल वाढीस लागेल. दिवसाचा उत्तरार्ध कुटुंबासोबत हास्य-विनोद, मौज-मजा करण्यात आनंदात व्यतीत होऊ श

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post