मऊ आणि चमकदार केस हवे आहेत ? जाणून घ्या कसं फॉलो करायचं ग्लास हेअर ट्रेंड

 


माय अहमदनगर वेब टीम

हेल्थ डेस्क - हेअर केअर रुटीनमध्येही हल्ली नवनवीन ट्रेंड पाहायला मिळतात. कधीकाळी लोकप्रिय झालेल्या काही हेअरस्टाइल किंवा हेअर ट्रेंडची क्रेझ लोकांमध्ये पुन्हा नव्याने पाहायला मिळते. काही हेअरस्टाइल घरी करून पाहणं कठीण असते, पण ग्लास हेअर ट्रेंड फॉलो करणं अतिशय सोपं आहे. २०१८ दरम्यान ग्लास हेअर ट्रेंडची क्रेझ लोकांमध्ये प्रचंड पाहायला मिळाली होती. यावर्षी सोशल मीडियावर पुन्हा ही ट्रेंड सुरू झाल्याचे दिसत आहे

ग्लास हेअर ट्रेंड फॉलो केल्यास केस चमकदार आणि मऊ होण्यास मदत मिळते. तुम्हाला देखील आपले केस निरोगी आणि चमकदार हवे आहेत का? जाणून घ्या घरी बसल्या कसा मिळवावा ग्‍लास हेअर लुक…

​केसांच्या निरोगी आरोग्यासाठी

ग्लास हेअर लुक मिळवण्यासाठी सर्वप्रथम आपले केस निरोगी असणं आवश्यक आहे. यासाठी नियमित स्वरुपात व्हिटॅमिनयुक्त आहाराचे सेवन करावे, स्टाइल  टुल्सचा वापर कमी करावा आणि केसांवर ब्लीच ट्रीटमेंट करू नये. अशी काळजी घेतल्यास केसांचे नुकसान होणार नाही. तसंच कोरड्या केसांची समस्या निर्माण होऊ नये, यासाठी उशीसाठी सिल्क कव्हरचा वापर करावा.

​केसांना करावा पोषण तत्त्वांचा पुरवठा

आपले केस शॅम्पू आणि कंडिशनरने धुतल्यानंतर ते सुकवण्यासाठी मायक्रोफायबर टॉवलचा वापर करावा. केस सुकल्यानंतर स्मूदिंग किंवा हीट-प्रोटेक्टिंग लीव-इन सीरम लावावे. ज्यामुळे केस जास्त काळ मऊ राहतील आणि केसांवर नैसर्गिक चमक देखील येईल.

​केस योग्य पद्धतीने सुकवा

केसांसाठी सिंथेटिक बोअर ब्रिसल ब्रशचा वापर करावा. अशा प्रकारच्या ब्रशचा वापर केल्यास केसांवर चमक येण्यास मदत मिळते. तसंच केस सुकवण्यासाठी कधीही ड्रायरचा वापर करू नये. कारण यामुळे केस कोरडे होण्याची शक्यता असते.

हलक्या हातानं केसांचा कंगवा करावा म्हणजे केस तुटणार नाहीत. यानंतर ब्रशच्या मदतीने केसांमध्ये भांग पाडून ब्लो ड्राय करून घ्या

​आपले केस स्ट्रेट करा

केस सरळ करण्यासाठी स्ट्रेटनर किंवा ब्रशचा देखील आपण वापर करू शकता. हेअरलाइनच्या भोवती एक शेप सेट करून घ्यावा. ब्लो-ड्राय केल्यानंतर हेअर सीरम देखील लावू शकता. केसांवर सीरम लावल्यामुळे केस थोडे तेलकट दिसतील. पण केस सरळ होऊन सुकल्यानंतर केसांमधील तेल आपोआप कमी होईल. स्ट्रेटनिंग पूर्ण झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा ड्राय ऑइलचा वापर करू शकत

NOTE : केसांशी (Hair Care Tips) संबंधित कोणत्याही ट्रीटमेंट करण्यापूर्वी आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. कारण प्रत्येकाच्या केसांचा पोत आणि प्रकार वेगळा असतो. केसांचे नुकसान टाळण्यासाठी दुसऱ्यांचे हेअर केअर रुटीन फॉलो करू नये.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post