चंद्र-शुक्रचा शुभ योग : 'या' ६ राशींना लाभाचा दिवस; आजचे राशीभविष्य

 


माय अहमदनगर वेब टीम

बुधवार, ११ नोव्हेंबर २०२०. चंद्र दुपारनंतर कन्या राशीत प्रवेश करेल. कन्या राशीत शुक्र विराजमान आहे. त्यामुळे चंद्र व शुक्रचा शुभ योग जुळून येत आहे. कर्क राशीच्या व्यक्तींना अचानक धनलाभ संभवतो. मिथुन राशीच्या व्यक्तींना कार्यक्षेत्रात प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतील. तुमच्यासाठी कसा असेल आजचा दिवस? कोणत्या राशीच्या व्यक्तींना काय लाभ मिळू शकतील? जाणून घेऊया... 

आजचे मराठी पंचांग : बुधवार, ११ नोव्हेंबर २०२०

मेष : नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होतील. प्रतिस्पर्ध्यावर लक्ष ठेवा. दुसऱ्यांसाठी धावपळ करावी लागेल. कार्यक्षेत्रातील काही बदल आपल्यासाठी लाभदायक ठरू शकतील. दिवसाच्या उत्तरार्धात आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतील. प्रकृती जपा. 

वृषभ : निर्णय घेताना द्विधा मनस्थितीत अडकू नका . नोकरीच्या ठिकाणी काळजीपूर्वक लक्ष द्या. कुटुंबासोबत उत्तम वेळ व्यतीत कराल. दुपारनंतर शुभवार्ता मिळू शकतील. आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक. दिवसाचा उत्तरार्ध हास्य-विनोद, मौज-मजेत व्यतीत होईल. 

मिथुन : घरामध्ये मनोरंजनात्मक वातावरण राहील. मोठ्या लोकांची साथ मिळेल. आजचा दिवस शुभफलदायक ठरू शकेल. दिनक्रम अतिशय व्यस्त राहू शकेल. अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवणे हिताचे ठरेल. वाहन चालवताना सावधगिरी बाळगावी. मनोबल वाढेल. जोडीदाराची साथ मोलाची ठरेल. 

कर्क : वाट पहात असलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. गणपतीची आराधना करा. आजचा दिवस अनुकूल असेल. अचानक धनलाभ संभवतात. व्यावसायातील काही प्रकल्प पुन्हा सुरू करू शकाल. योजनांना गती मिळेल. मान, प्रतिष्ठा वृद्धिंगत होईल. भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नये.

सिंह : दिवसाची सुरुवात आनंदी होईल. आपले बोलणे लोकांना पटेल. आजचा दिवस विशेष ठरू शकेल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना उत्तम दिवस. मुलांसंदर्भात एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागेल. मात्र, सारासार विचार करूनच निर्णय घ्यावा. प्रलंबित कामे मार्गी लागतील. दिवसाच्या उत्तरार्धात प्रिय व्यक्तींची भेट होऊ शकेल. 

कन्या : घरामध्ये समाधान मिळेल. तिखट व जळजळीत पदार्थ आहारात टाळा. आजचा दिवस चांगले परिणाम देणारा ठरेल. आनंदाची अनुभूती घ्याल. विरोधक, हितशत्रू पराभूत होतील. वैवाहिक जीवन सुखमय असेल. घरातील ज्येष्ठांची सेवा करण्याची संधी प्राप्त होऊ शकेल. चांगल्या कामासाठी पैसे खर्च होतील. 

तुळ : आपल्याला हवे ते उत्तर मिळून जाईल. नोकरीमध्ये वरिष्ठांशी हुज्जत घालू नका. विद्यार्थ्यांसाठी विशेष शुभफलदायी दिवस. स्पर्धा परीक्षांमध्ये विशेष प्राविण्य मिळू शकेल. मिळकतीचे नवे स्रोत सापडतील. संवाद कौशल्याने मान, सन्मान मिळतील. मोसमी आजार त्रस्त करू शकतील. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. 

वृश्चिक : ऑफिसच्या कामामध्ये बदल होतील. खेळ-कला क्षेत्रात चमक दाखवाल. आर्थिक स्थिती सुधारेल. आवडते काम करण्यात वेळ व्यतीत होईल. यश, कीर्ती वृद्धिंगत होईल. प्रलंबित कामे मार्गी लागतील. प्रिय व्यक्तींच्या भेटीचे योग. बोलताना तारतम्य बाळगावे. अन्यथा प्रतिमा मलिन होण्याची शक्यता. दिवसाचा उत्तरार्ध उत्तम असेल. 

धनु : आपल्या बोलण्यातील कटुता टाळा. समोरच्यावर सहज विश्वास ठेवू नका. खर्चात वाढ संभवते. गृहपयोगी वस्तूंची खरेदी कराल. आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी. हितशत्रू, विरोधक नामोहरम होतील. कार्यालयातील सहकाऱ्यांमुळे काही समस्यांना सामोरे जावे लागू शकेल.

मकर : सामाजिक क्षेत्रातील कामे हातून घडतील. आपले कर्तृत्व दाखवून द्याल. भाग्याची उत्तम साथ लाभेल. व्यवसायिकांना लाभदायक दिवस. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडाल. स्पर्धा परीक्षांत विशेष प्राविण्य मिळवाल. वाहन चालवताना सावधगिरी बाळगावी. मानसिक शांतता आणि प्रसन्नता लाभेल. 

कुंभ : दिवस फायद्याचा ठरेल. आरोग्याबाबत अस्थिरता जाणवेल. मोसमी आजार त्रस्त करू शकतील. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. पथ्यपाणी, औषधे चुकवू नयेत. वेळीच वैद्यकीय सल्ला घ्यावा. संपत्ती खरेदी करण्यापूर्वी सर्व बाबी तपासून घेणे हिताचे ठरेल. 

मीन : भागीदारीत ताळमेळ जमून येईल. एकटे राहून विचार करा. आजचा दिवस शुभ ठरेल. वैवाहिक जीवन आनंदी आणि सुखमय असेल. काही छोटे प्रवास संभवतात. व्यवसायातील प्रगतीमुळे मन प्रसन्न होईल. विद्यार्थ्यांना तणावमुक्तीचा दिवस. दिवसाच्या उत्तरार्धात एखादी महत्त्वाची माहिती हाती लागू शकेल. पालकांचा सल्ला मोलाचा आणि लाभदायक ठरू शकेल.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post