मुंबई इंडियन्स IPLचे राजे; विक्रमी विजेतेपदासह केले अनेक रेकॉर्ड

 


माय अहमदनगर वेब टीम

दुबई: ipl 2020 final mi vs dc आयपीएलच्या १३व्या हंगामाचे विजेतेपद मिळून मुंबई इंडियन्सने नवा विक्रम केला आहे. मुंबई संघाचे हे विक्रमी पाचवे विजेतेपद असून आयपीएलच्या इतिहासात अन्य कोणत्याही संघाला अशी कामगिरी करता आली नाही. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) नंतर सर्वाधिक विजेतेपद मिळवण्याचा विक्रम चेन्नई सुपर किंग्जचा आहे. त्यांनी तीन वेळा विजेतेपद मिळवले. 

आयपीएलच्या १३व्या हंगामात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात चार वेळा लढती झाल्या. यातील दोन लढती साखळी फेरीतील होत्या. तर तिसरी लढत क्वालिफायर १ मध्ये झाली होती. या चारही लढती मुंबईने जिंकल्या. दिल्लीला एकाही सामन्यात त्यांचा पराभव करता आला नाही. 

मुंबईची आयपीएलमधील विजेतेपदे

१) २०१३- चेन्नई सुपर किंग्जवर २३ धावांनी विजय

२) २०१५- चेन्नई सुपर किंग्जवर ४१ धावांनी विजय

३) २०१७- रायझिंग पुणेवर १ धावांनी विजय 

४) २०१९- चेन्नई सुपर किंग्जवर १ धावांनी विजय 

५) २०२०- दिल्ली कॅपिटल्सवर ५ विकेटनी विजय 

आयपीएलचे सलग दोन वेळा विजेतेपद मिळवण्याचा विक्रम चेन्नई सुपर किंग्जच्या नावावर होता. त्यांनी २०१० आणि २०११ साली अशी सलग दोन विजेतेपद मिळवली होती. मुंबईने या विक्रमाशी बरोबरी केली. मुंबईने २०१९ आणि २०२० मध्ये चषक उंचावला

याच बरोबर मुंबई इंडियन्स हे देखील सिद्ध करून दाखवले की ते सम संख्या असलेल्या वर्षात देखील विजेदेपद मिळून शकतात. तसेच याआधी त्यांनी कधीच धावांचा पाठलाग करताना विजेतेपद मिळवले नव्हते. २०१० मध्ये धावांचा पाठलाग करताना मुंबईचा पराभव झाला होता.

आयपीएलच्या इतिहासात दोनच असे संघ आहेत ज्यांनी गुणतक्त्यात पहिले स्थान मिळवले आणि नंतर स्पर्धेचे विजेतेपद देखील मिळवेल. अशी कामगिरी राजस्थान रॉयल्सने २००८ साली केली होती. त्यानंतर मुंबई इंडियन्सने २०१७, २०१९ आणि २०२० मध्ये अशी कामगिरी केली आहे. 

इतक नव्हे तर मुंबई इंडियन्सने या हंगामात फक्त १५ खेळाडू (अंतिम ११चा संघ) वापरले. इतके कमी खेळाडू वापरून विजेतेपद मिळवणारा तो एकमेव संघ आहे. चेन्नई सुपर किंग्जने २०१५ साली १४ खेळाडू वापरले होते आणि ते दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post