कोणत्या राशीच्या व्यक्तींनी काय काळजी घ्यावी? वृश्चिक राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस कसा जाईल? वाचा.. माय अहमदनगर वेब टीम

शुक्रवार, १६ ऑक्टोबर २०२०. चंद्र संपूर्ण दिवस बुधचे स्वामीत्व असलेल्या कन्या राशीत विराजमान असेल. चंद्राच्या प्रभावामुळे वृषभ राशीच्या व्यक्तींना अचानक लाभ मिळू शकतो. सन २०२० चे वैशिष्ट्य ठरलेल्या अश्विन महिन्याची सांगता आज होत आहे. तुमच्यासाठी कसा असेल आजचा दिवस? कोणत्या राशीच्या व्यक्तींना काय लाभ मिळतील? जाणून घ्या...

आजचे मराठी पंचांग : शुक्रवार, १६ ऑक्टोबर २०२०

मेष : अचानक उभवणाऱ्या समस्यांना सामोरे जावे लागेल. बुद्धीला पटेल तोच निर्णय घ्या. संमिश्र घटनांचा दिवस. कार्यालयातील अधिकारी वर्गाशी मतभेद होऊ शकतील. आपल्या माणसांची योग्य साथ लाभेल. मन प्रसन्न होईल. वैवाहिक जीवनातील सुलभता वाढीस लागेल. 


वृषभ : घरामध्ये शुभ वार्ता समजतील. संततीच्या उत्कर्षाचा काळ. व्यापारी वर्गाला अधिक मेहनत, परिश्रम घेण्याचा दिवस. सरकारी कर्मचाऱ्यांचे कार्यालयात मतभेद होऊ शकतात. दिवसाच्या उत्तरार्धात जनसंपर्कातून लाभ मिळू शकतील. नवीन योजनांवर लक्ष केंद्रीत कराल. अचानक एखादा उत्तम लाभ मिळू शकेल. मित्रांची मदत मोलाची ठरू शकेल. गुंतवणुकीतून लाभ शक्य. 

मिथुन : नोकरीच्या संधी येतील. नवीन तंट्यामध्ये स्वतःला उगाच गोवून घेऊ नका. लाभदायक दिवस. दिवसाच्या पूर्वार्धात प्रलंबित येणी प्राप्त होऊ शकतील. शेअर बाजारातील गुंतवणूक फायदेशीर ठरू शकेल. नोकरी, व्यवसायाशी संदर्भात एखादे प्रकरण मिटेल. दिवसाचा उत्तरार्ध कुटुंबासोबत उत्तमपणे व्यतीत होऊ शकेल. मुलांचे एखादे कृत्य त्रस्त करू शकेल. 

कर्क : आपल्या अधिकाराचा अति वापर टाळा. नोकरी व्यवसायात मर्जी राखाल. आत्ममग्न राहाल. केवळ आपल्या कामाकडे लक्ष केंद्रीत करून कार्यरत राहणे हिताचे ठरू शकेल. यश व प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतील. जनसंपर्कात भर पडू शकेल. समाजातील आपला प्रभाव वृद्धिंगत होईल. गुंतवणुकीसाठी अनुकूल कालावधी. 

सिंह : कुटुंबातील सौख्याचा समतोल राखा. कलाक्षेत्राबाबत आपल्याला अपेक्षित अशा वार्ता समजतील. हितशत्रू त्रास देण्याचा प्रयत्न करतील. मात्र, त्यांना यश मिळणार नाही. अनामिक भीतीने मन विचलित होऊ शकेल. नवीन संधीतून उत्तम लाभ मिळू शकतील. सामाजिक जबाबदारी वाढेल. अनोळखी व्यक्तींची आर्थिक व्यवहार टाळावेत. नुकसान संभवते. 

कन्या : नवीन क्षेत्रातील गुंतवणूक योग्य व्यक्तीच्या सल्ल्याविना करू नका. मोठी वाहने चालवताना काळजी घ्या. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. रचनात्मक कार्याची आवड वाढेल. कोणाची वाद झाल्यास रागावर नियंत्रण ठेवणे हिताचे ठरेल. दिवसाच्या उत्तरार्धात अचानक लाभ मिळू शकेल. प्रलंबित येणी प्राप्त होऊ शकतील. वादाचे प्रसंग टाळावेत. 

तुळ : घरातील मोठ्यांचे अनुभवाचे सल्ले नक्की उपयोगी पडतील. अचानक येणाऱ्या खर्चाला योग्य पद्धतीने सामोरे जा. पद आणि महत्त्वाकांक्षेची अभिलाषा पूर्ण होऊ शकेल. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक केले जाईल. एखाद्या घटनेने मन विचलित होऊ शकेल. समस्याच्या निराकरणाबाबत संभ्रम निर्माण होऊ शकेल. इच्छा नसतानाही प्रवास करावे लागू शकतील. 

वृश्चिक : लोकांवर संपूर्ण अवलंबून राहू नका. पुढे ढकललेले कामे पुन्हा हातात घ्या. संमिश्र घटनांचा दिवस. विनाकारण मन विचलित होऊ शकेल. शक्यतो घराच्या बाहेर पडू नये. सावधगिरी बाळगून दैनंदिन व्यवहार करावेत. निराशाजनक विचार टाळावेत. मुलांकडून शुभवार्ता मिळू शकतील. रुचकर भोजनाचा आनंद घेऊ शकाल. मन प्रसन्न होईल. 

धनु : दूरदृष्टीने पुढील योजना आत्ताच आखून ठेवा. नोकरीत आपल्या मुद्द्यांवर ठाम रहा. प्रलंबित कामे मार्गी लागल्याने मन प्रसन्न होईल. कुटुंबातील सदस्यांची योग्य साथ लाभेल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. दैनंदिन व्यवहारात निष्काळजीपणा करू नका. नवीन संपर्कातून उत्तम लाभ मिळतील. 

मकर : जोडीदाराच्या साथीने आपल्या मनोकामना पूर्ण होतील. व्यवसायात अति विश्वास ठेवू नका. कार्यक्षेत्रात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात. पराक्रमात वाढ होईल. हितशत्रू, विरोधक पराभूत होतील. दिवसाच्या उत्तरार्धात खर्चात वाढ संभवते. चांगल्या लोकांच्या सहवास वा संपर्काने मन प्रसन्न होईल. उत्साहाने कार्यरत राहाल. कौटुंबिक नातेसंबंध सुधारतील. 

कुंभ : कोणाकडून फसवले जाणार नाही त्याची खात्री बाळगा. आरोग्याच्या कोणत्याही तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. ग्रहांची अनुकूलता लाभदायक तसेच यशकारक ठरू शकेल. आवडीच्या वस्तू खरेदी करण्याकडे कल राहील. अचानक पाहुण्यांचे आगमन होऊ शकेल. मानसिक शांतता आणि प्रसन्नता लाभेल. 

मीन : नातेवाईक अथवा मित्रांच्या सल्ल्यावर विचार करा. आहारात आवश्यक ती पथ्ये पाळा. भाग्याची भक्कम. मानसिक शांतता व प्रसन्नता लाभेल. मुलांकडून शुभवार्ता मिळू शकतील. दिवस उत्तम पद्धतीने व्यतीत होईल. स्पर्धेत यश शक्य. एखादी विशेष गोष्ट साध्य केल्याने आनंदाची अनुभूती घेऊ शकाल. मात्र, मोसमी आजार त्रस्त करू शकतील.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post