कोरोना रुग्णांना दिलासा ; रेमडेसिवीरचा दर निश्चित



 माय अहमदनगर वेब टीम

मुंबई ; मध्यम व तीव्र स्वरूपाचा कोविड असेलल्या रुग्णांना रेमडेसिवीर हे इंजेक्शन दिले जाते. मात्र राज्यात खासगी रुग्णालयांमध्ये हे औषध लिहून दिल्यानंतर ते मिळवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ होते. तसेच या औषधाची किंमतही वेगवेगळी सांगितली जाते. त्यामुळे खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना वेळेमध्ये आणि वाजवी दरामध्ये इंजेक्शन रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान एका खासगी औषधी केंद्रामध्ये निश्चित दराने हे इंजेक्शन (१०० मि.ग्रॅ) उपलब्ध करण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. खासगी रुग्णालयातील रुग्णांसाठी या शंभर मि. ग्र.च्या इंजेक्शनची २,३६० रुपये किंमत निर्धारित करण्यात आली आहे. 


यासंदर्भात अन्न व औषध प्रशासनाकडे विस्तृत अहवाल मागवला होता. त्यामध्ये रेमडेसिवीरच्या तुटवड्यावर निश्चित उपाय करण्यासाठी हे निर्देश सरकारने दिले आहेत. अन्न व औषध प्रशासनाकडून रेमडेसिवीर उपलब्ध करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील खासगी औषधी केंद्रे निश्चित करण्यात आली आहे. जिल्हा शल्य चिकित्सकाकंडून जिल्ह्यातील खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना लागणाऱ्या इंजेक्शनची रोजची गरज निश्चित करण्यात येणार आहे. ही गरज आरोग्य सेवा संचालकांना कळवण्यात येणार आहे. त्यांनी संबधित जिल्ह्यांच्या रुग्णसंख्येनुसार प्रत्येक जिल्ह्याच्या इंजेक्शन रेमडेसिवीर (१०० मिली ग्रॅम)चा कोटा निश्चित करून तो एफडीएच्या आयुक्तांना द्यायचा आहे. या योजनेमध्ये समाविष्ट उत्पादक कंपन्यांकडून दररोज निश्चित केलेल्या दराने पाच हजार इंजेक्शन पुरवठा करायचा आहे. या व्हायल्स आरोग्य सेवा संचालकांनी नेमून दिलेल्या खासगी फार्मसी स्टोअरला वितरित करण्यात येणार आहे. याची जबाबदारी अन्न व औषध प्रशासनाची असणार आहे. 


सुसूत्रता येईल


खासगी औषधी केंद्र रुग्णांना औषध वितरण मान्यतेसाठी मुंबईमध्ये कार्यकारी आरोग्य अधिकारी आणि इतर जिल्ह्यातील जिल्हा शल्य चिकित्सक किंवा वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालय यांच्याशी संलग्न करण्यात येईल. त्यामुळे या औषधी केंद्रांच्या वाटप, साठा व नियंत्रणामध्ये सुसूत्रता येईल असा सरकारचा उद्देश आहे.


संबधित सूचनाही सादर


खासगी रुग्णालयाने हे इंजेक्शन आवश्यक असल्याचा प्रस्ताव त्या शहरातील परवानगीसाठी आरोग्य अधिकाऱ्याकडे सादर करणे गरजेचे आहे. या रुग्णालयाच्या प्रमुखाने या प्रस्तावासोबत इंजेक्शनसाठी प्रिस्क्रिप्शन, रुग्णांचा करोना पॉझिटीव्ह रिपोर्ट (आयसीएमआर आयडी)सह रुग्णाच्या आधारकार्ड किंवा इतर फोटो असलेल्या परवाना, प्रमाणपत्राची प्रत, रुग्णांची वैद्यकीय माहिती देणे बंधनकारक आहे. खासगी औषधी केंद्राकडे मागणीपत्र आल्यानंतर त्यांनी त्यामध्ये नमूद केलेल्या संख्येइतके इंजेक्शनच्या वायल्स २,३६० रुपये प्रति दराने उपलब्ध करायला हव्यात. त्याचे बिल संबधित रुग्णाकडून घ्यायचे आहे. संबधित फार्मसीने त्यांच्या रजिस्टरमध्ये रुग्णाचा तपशील आणि दिलेल्या व्हायल बॅच क्रमाकांसह नोंद करावी. मागणीपत्र रेकॉर्डसाठी जपून ठेवावेत तसेच रोज रात्री साडेआठ वाजता एफडीएकडे किती साठा उपलब्ध आहे, याची माहिती द्यायची आहे. एफडीचे अधिकारी ही माहिती जिल्ह्याधिकाऱ्यांना सादर करतील, एफडीएने प्रत्येक जिल्ह्याासठी एक नोडल अधिकारी नेमायचा आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post