कंगनाने शिवसेनेचे नाक कापले! खा. नारायण राणेंचा जोरदार हल्लाबोल


माय अहमदनगर वेब टीम

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत मुंबईत आली. तिच्या घरी गेली. तिने प्रतिक्रिया दिली आणि शिवसेनेचे नाक कापले. मुंबईत कायदा आणि सुव्यवस्था आहे का? हा माझा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना प्रश्न आहे. कंगना जर मुंबई, महाराष्ट्राचा अपमान करत असेल, तर कायद्यात तरतूद आहे, कारवाई करा. मुख्यमंत्री ‘मातोश्री’च्या पिंज-यात कशाला बसलेत, अशा खोचक शब्दात माजी मुख्यमंत्री, भाजप नेते खा. नारायण राणे यांनी बुधवारी हल्लाबोल केला.


कंगना रानौत आणि शिवसेनेत वाद सुरू झाल्यानंतर कंगनाला मुंबईत येऊ देणार नाही, तिचे थोबाड फोडू अशा वल्गना शिवसेनेने केल्या होत्या. मात्र शिवसेनेच्या धमक्यांना भिक न घालता कंगनाचे बुधवारी दुपारी मुंबईत आगमन झाले. 

तत्पूर्वी मुंबई महापालिकेने सूडबुध्दीने कारवाई करत कंगनाच्या कार्यालयाची तोडफोड केली. तसेच विधिमंडळाचे दोन दिवसांचे पावसाळी अधिवेशनातील सरकारचे विशेषत: शिवसेनेच्या अपयशाचा पाढा वाचण्यासाठी खा. नारायण राणे यांनी भाजपच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन जोरदार हल्ला चढविला. यावेळी भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी, आ. नितेश राणे उपस्थित होते.


कंगनाने काही चुकीचे विधान केले असेल तर आम्ही त्याच्याशी सहमत नाही, असे स्पष्ट करून खा. नारायण राणे यांनी तिच्या चुकीच्या वक्तव्यावर सरकारने कायदेशीर कारवाई कारवाई करावी अशी मागणी केली. राणे म्हणाले की, कंगनाविरोधात भारतीय कामगार सेनेचे कर्मचारी एअरपोर्टवर आंदोलन करत होते. मोजून ६७ जण होते. आमच्या लोकांनी मोजले.


मुंबईत मराठी माणूस फक्त ३० टक्के उरल आहे. एकही मतदारसंघ मराठी माणसाच्या जीवावर निवडून येऊ शकत नाही. कंगना मुंबई, महाराष्ट्राचा अपमान करत असेल तर कायद्यात तरतूद आहे, कारवाई करा. मुख्यमंत्री मातोश्रीच्या पिंज-यात कशाला बसले आहेत. कंगना मुंबईत आली, घरी गेली, प्रतिक्रिया दिली आणि शिवसेनेचे नाक कापले. शिवसेना खासदार संजय राऊतला नाक तरी आहे का?, असा सवालही राणे यांनी उपस्थित केला.


राज्याचे दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन संपले. विधीमंडळाचे अधिवेशन दोन दिवस हे मनाला पटत नाही. राज्याच्या जनतेला दोन दिवसीय अधिवेशनाने काय दिले हा विषय महत्त्वाचा आहे, असे नारायण राणे म्हणाले.


माझ्याकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोघांची भाषणे आहेत. पहिल्या दिवशी अर्धा दिवस अधिवेशन चालले. त्यावेळी शोक प्रस्ताव मांडून ते दुपारी संपवले. दुसºया दिवशी पुरवण्या मागण्या, १२ बिले एवढे कामकाज असताना, सत्ताधाºयांनी अधिवेशनात हैदोस घातला. त्यामुळे अधिवेशनला वेळ मिळाला नाही. बिले चर्चेशिवाय मंजूर करून घेतली. देवेंद्र फडणवीस यांनी अभ्यासपूर्ण भाषण केले. त्यांना राज्यातील समस्या मांडल्या. मात्र, मुख्यमंत्र्यांनी एकाही प्रश्नाचे उत्तर दिले नाही. लोकांच्या भयावह परिस्थितीबद्दल मुख्यमंत्री काहीही बोलले नाही. एवढ्या मोठ्या विदर्भाला फक्त १६ कोटी दिले, १६००कोटी दिले असते तरी ते पुरले नसते. कोकणात मदतीचा एकही रुपया आलेला नाही, अशी टीका राणे यांनी केली.


बेकारी वाढतेय, शेतक-यांचे, मजूरांचे प्रश्न आहेत. हे सर्वजण अडचणीत आहे. त्यांच्या घरात आज अन्न नाही, यावर मुख्यमंत्री का बोलले नाहीत. सरकार म्हणून काय करणार याबद्दल काही बोलले नाही, अशी टीका नारायण राणेंनी केली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post