अशुभ योगामध्ये होत आहे दिवसाची सुरुवात ; तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

 


माय अहमदनगर वेब टिम

गुरुवार, 10 सप्टेंबरला 12 पैकी सहा राशीच्या लोकांनी सांभाळून राहण्याची आवश्यकता आहे. आजच्या दिवशी रोहिणी नक्षत्रामुळे वज्र नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. यामुळे सहा राशीच्या लोकांना धनहानीला सामोरे जावे लागू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांचे काम बिघडू शकते. वरिष्ठांशी मतभेद होऊ शकतात. काही निर्णय चुकीचे ठरू शकतात. या व्यतिरिक्त इतर सहा राशीच्या लोकासांठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार....

मेष: शुभ रंग : पिस्ता | अंक : ६

आज तुमच्या राशीच्या धनस्थानातून चंद्रभ्रमण होत असल्याने पैशाची समस्या सुटेल. नैराश्य दूर होईल.

वृषभ: शुभ रंग : सोनेरी | अंक : ७

आज आपल्याच धुंदीत व आपल्याच मस्तीत रहाल. इतरांचे विचार पटणार नाहीत. अती आत्मविश्वासाने नुकसान होईल. तब्येतीवर वाईट परीणाम होईल.


मिथुन : शुभ रंग : पांढरा | अंक : ३

रिकामटेकडया चर्चेत व वादविवादात वेळ फुकट जाईल. महत्वाची कामे दुर्लक्षित होतील. आज एखाद्या मॉलमधे फेरफटका माराल. बिनधास्त खर्च कराल.


कर्क : शुभ रंग : चंदेरी | अंक : १

चैन करायला हाती पुरेसा पैसा असेल. नवविवाहितांची स्वप्ने साकार हेतील. संतती कडून गुड न्यूज येतील.


सिंह :शुभ रंग : केशरी|अंक : ४

व्यापाऱ्यांसाठी उत्तम दिवस. दुकनदारांच्या गल्ल्यात वाढ होईल. नोकरदार वरीष्ठांची मर्जी संपादन करतील.


कन्या : शुभ रंग : हिरवा|अंक : २

आज सज्जनांचा सहवास लाभेल. काही नव्या गोष्टी शिकायची संधी मिळेल. सत्संगाकडे पाय वळतील.


तूळ : शुभ रंग : स्ट्रॉबेरी|अंक : ४ 

कार्यक्षेत्रात सावधपणे पावले टाका. महत्वाचे निर्णय घेताना द्विधा मन:स्थिती होईल. आज ताकही फूंकून प्या.


वृश्चिक : शुभ रंग : निळा|अंक : ५

आवक पुरेशी असली तरी बचतीस प्राधान्य देणे गरजेचे. आज वैवाहीक जिवनात गोडीगुलाबी असेल.


धनु : शुभ रंग : आकाशी|अंक : ७

आज अती आक्रमकता नुकसानास कारणीभूत होईल. नवीन ओळखीत डोळे झाकून विश्वास ठेऊ नका.


मकर : शुभ रंग : जांभळा|अंक : ६ 

अधुनिक राहणीमानाकडे तुमचा कल असेल. चैनी व विलासी वृत्ती बळावेल. रूग्णांची प्रकृती सुधारेल.


कुंभ : शुभ रंग : गुलाबी | अंक : ८

कौटुंबिक जिवन समाधानी असेल. तुम्ही कार्यक्षेत्रात आपल्या कतृत्वाचा ठसा उमटवाल. आईचे मन जपाल.


मीन : शुभ रंग : डाळिंबी | अंक : ९

तुमचा जास्त वेळ घराबाहेरच जाईल. बेरोजगारांच्या भटकंतीस यश येईल. आज भावंडांमधे सामंजस्य

राहील.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post