जाणून घ्या तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार
माय अहमदनगर वेब टीम

गुरुवार, 24 सप्टेंबर रोजी सूर्योदय मूळ नक्षत्रामध्ये होत आहे. ग्रह आणि नक्षत्रांच्या प्रभावातून आजच्या दिवशी सौभाग्य नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावातून 12 पैकी 9 राशीच्या लोकांसाठी दिवस फलदायी ठरू शकतो. तर उर्वरीत राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र स्वरुपाचा राहील.

राशीनुसार असा राहील आजचा दिवस


मेष : शुभ रंग : पिस्ता | अंक : ७


आज स्वावलंबन महत्त्वाचे राहील. रागावून निघून गेलेल्या व्यक्ती आज दुपारनंतर घरी परत येतील.


वृषभ : शुभ रंग : मोतिया | अंक : ९


नोकरीच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढल्या तरी बढतीच्या मार्गातील अडथळेही दूर झाल्याचे जाणवेल. तुमच्या कामातील निष्ठा व समर्पण वरिष्ठांना प्रभावित करेल.


मिथुन : शुभ रंग : मरून | अंक : ३


रिकामटेकडी चर्चा फक्त वादास निमंत्रण देईल. आज फक्त कृतीस प्राधान्य देणे गरजेचे आहे. सरकार दरबारी रखडलेली काही कामे दुपारनंतर मार्गी लागतील.


कर्क : शुभ रंग : गुलाबी | अंक : ८


भवना व कर्तव्य यांचा समन्वय साधणे कठीण जाईल. वैवाहिक जीवनात पत्नीची मते विचारात घेणे गरजेचे.


सिंह : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : १


व्यावसायिक चढउतारांचा सामना करावाच लागणार आहे. काही मनाविरुद्ध घटना मनास बेचैन करतील.


कन्या : शुभ रंग : राखाडी | अंक : ४


नोकरीच्या ठिकाणी अधिकारी वर्गाची आपल्यावर मर्जी आहेच या भ्रमात राहू नका. सहकाऱ्यांशी जुळवून घ्या.


तूळ : शुभ रंग : सोनेरी | अंक : ३


सहकुटुंब मनोरंजनास प्राधान्य द्याल. संध्याकाळी कदाचित डॉक्टरांच्या भेटीचा योग दिसतोय.


वृश्चिक : शुभ रंग : डाळींबी | अंक : ५


कार्यक्षेत्रात प्रगतीचा आलेख चढता राहील. नोकरदारांना नोकरीत बदल करण्यासाठी चांगल्या संधी येतील.


धनू : शुभ रंग : आकाशी | अंक : २


आज कौटुंबिक कर्तव्ये पार पाडण्यासाठी वेळ काढावा लागेल. मुलांना दिलेले शब्द पाळावे लागणार आहेत.


मकर : शुभ रंग : पांढरा | अंक : १


दुपारनंतर विविध मार्गाने आर्थिक लाभ होतील. भावनेच्या भरात दिलेले शब्द पाळावे लागतील.


कुंभ : शुभ रंग : गुलाबी | अंक : ६


पैशाची उधळपट्टी थांबवणे गरजेचे आहे. आज काही अती आवश्यक खर्च हात जोडून उभे राहतील.


मीन : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ५


उद्योग व्यवसायात पूर्वीच्या कष्टांचे फळ मिळेल. आपल्या कर्तृत्वास थोरामोठ्यांचे अाशीर्वाद लाभतील. प्रसन्न दिवस.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post