मोदी सरकारविरोधात एकत्र या ! सोनिया गांधींचे मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत आवाहन

माय अहमदनगर वेब टीम

नवी दिल्ली - केंद्र सरकारने ११ ऑगस्ट रोजी झालेल्या अर्थ स्थायी समितीच्या बैठकीत यावर्षी आपल्याला १४ टक्के जीएसटी नुकसान भरपाई देणे शक्य नसल्याचे सांगितले. हा नकार म्हणजे मोदी सरकारने दिलेला विश्वासघात आहेत, अशी टीका सोनिया गांधी यांनी बुधवारी केली.

सोनिया गांधी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बिगर भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली होती. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पडलेल्या बैठकीत काँग्रेसचे चार आणि तर इतर पक्षांचे तीन मुख्यमंत्री सहभागी झाले, पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी बैठकीत सांगितले की, ‘परिस्थिती अजून बिघडत चालली आहे. आपण जवळपास ५०० कोटी खर्च केले आहेत. आपण सध्या अशा परिस्थितीत आहोत जिथे राज्यांची तिजोरी रिकामी आहे. केंद्र सरकारने जीएसटी नुकसान भरपाईदेखील दिलेली नाही. आपण एकत्रितपणे पंतप्रधानांना सामोरे गेले पाहिजे’.

सर्व राज्यांनी एकत्र आले पाहिजे अशी विनंती यावेळी ममता बॅनर्जी यांनी केली. ‘माझी विनंती आहे की, सर्वांनी एकत्र येऊन सुप्रीम कोर्टात जाऊया आणि जोपर्यंत परिस्थिती सुधारत नाही तोपर्यंत जेईई आणि आणि नीट परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करावी,’ असे ममता बॅनर्जी यांनी यावेळी सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post