जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

 

माय अहमदनगर वेब टीम

गुरुवार, 27 ऑगस्ट रोजी 12 पैकी सात राशीच्या लोकांनी सांभाळून राहण्याची आवश्यकता आहे. गुरुवारी विषकुंभ नावाचा अशुभ योग जुळून येत असल्यामुळे या सात राशीच्या लोकांना धनहानीला सामोरे जावे लागू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांचे काम बिघडू शकते. वरिष्ठांशी मतभेद होऊ शकतात. काही निर्णय चुकीचे ठरू शकतात. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकासांठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार...

मेष: शुभ रंग : तांबूस | अंक : ९

काही गोडबोली माणसे भेटतील. तुम्ही कामापुरतेच बोला. आज झटपट लाभाचा मोह टाळणेच हिताचे.

वृषभ: शुभ रंग : डाळिंबी | अंक : १

व्यक्तीवर तुमच्या प्रभावी व्यक्तिमत्वाचा प्रभाव राहील. आज सभासंमेलनात तुमच्या वक्तृत्वाचा प्रभाव पडेल. जोडीदाराचे मन जपण्याचा प्रयत्न कराल.


मिथुन : शुभ रंग : जांभळा|अंक : ४

आज फक्त कष्ट करीत रहा, फळाची अपेक्षा मात्र उद्याच करा. आज काही कंटाळवाणी कामे करावी लागणार आहेत. नोकरीत वरीष्ठांचे समाधान अशक्य.


कर्क : शुभ रंग : नारिंगी|अंक : ४

बऱ्याच दिवसांनी कही जुन्या मित्रांच्या सहवासात रमाल. आरोग्य उत्तम राहील. जीवाची मुंबई कराल.


सिंह :शुभ रंग : भगवा|अंक : २

तुमचे मनोबल वाढवणाऱ्या कही घटना घडतील. भावनेच्या भरात घेतलेले निर्णय मात्र चुकू शकतात.

कन्या : शुभ रंग : गुलाबी|अंक : ९

व्यवसायात जाहीरातबाजी वाढवावी लागेल. काही तत्व गुंडाळून ठेवावी लागतील. डोके शांत ठेवण्याची गरज.

तूळ : शुभ रंग : निळा|अंक : ३

आज रिकाम्या गप्पांपेक्षा कृतीस प्राधान्य दिलेत तरच ध्येय गाठता येतील. शेजाऱ्यांशी थोडे मतभेद होतील.

वृश्चिक : शुभ रंग : पांढरा|अंक : ५

हार्ड वर्क पेक्षा स्मार्ट वर्क करण्यास प्राधान्य द्या. व्यवसायात काही उत्तम संधी चालून येतील.

धनू : शुभ रंग : पिस्ता | अंक : ७

कौटुंबिक वाढत्या गरजांमुळे जमाखर्चाचा तराजू डळमळीत होण्याची शक्यता आहे. कायद्यात रहा.

मकर : शुभ रंग : राखाडी | अंक : १

वाहन खरेदीसठी कर्जमंजूरी होईल. विद्यार्थ्यांकडून कौतुकास्पद कामगिरी होईल. अाज म्हणाल ती पूर्व.

कुंभ : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ८

एखाद्या नव्या उपक्रमाची सुरवात करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. अनुभवी मंडळी संपर्कात येतील.


मीन : शुभ रंग : आकाशी | अंक : १

नोकरीच्या ठीकाणी आपल्या कामाव्यतिरीक्त फार खोलात शिरू नका. वरीष्ठांना काही सुचवण्यासाठी आजचा दिवस योग्य नाही.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post