धोनीच्या कोरोना चाचणीसंबंधी मोठी बातमी

 


माय अहमदनगर वेब टीम

चेन्नई - चेन्नई सुपर किंग्जचा (सीएसके) कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर सीएसकेचा गोलंदाज मोनू कुमार याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. बुधवारी दोन्ही खेळाडूंची चाचणी घेण्यात आली. इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १३ व्या सत्रात खेळण्यासाठी १४ ऑगस्टला धोनी चार्टर्ड प्लेनने चेन्नईला रवाना होणार आहे. 

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाची आयपीएल स्पर्धा युएईमध्ये खेळवली जाणार आहे. बीसीसीआयकडून याबाबत हिरवा कंदील देण्यात आला आहे. पुढील महिन्यात अर्थात १९ सप्टेंबर आयपीएलला प्रारंभ होत असून या स्पर्धेची सांगता १० नोव्हेंबरला होणार आहे. दरम्यान चेन्नई सुपर किंग (सीएसके) संघाचे खेळाडू युएईत जाण्यापूर्वी १५ ऑगस्टपासून चेन्नईच्या शिबिरात सामील होतील. सीएसकेची संघ २१ ऑगस्टला युएईला रवाना होईल.

आयपीएलमध्ये सीएसकेच्या सामन्यावेळी धोनीची पत्नी साक्षी आणि मुलगी जीवा अनेकदा मैदानात उपस्थित असतात. मात्र, यंदाच्या हंगामात या दोघी मैदानात दिसणार नाहीत कोरोनाच्या पार्शवभूमिवर धोनीने त्यांना भारतातच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. धोनी प्रमाणेच सीएसके संघातील इतर खेळाडूंही आपल्या कुटुंबियांना युएईला घेऊन जाणार नसल्याचे वृत्त आहे. 


युएईमध्ये जाण्यापूर्वी सर्व खेळाडूंची पाचवेळा कोरोना चाचणी आवश्यक...


बीसीसीआयने २० ऑगस्टनंतर सर्व फ्रँचायझींना यूएईमध्ये जाण्यास आधीच मान्यता दिली आहे. युएईमध्ये जाण्यापूर्वी खेळाडू आणि कर्मचार्‍यांची किमान पाच वेळा कोरोना चाचणी करणे आवश्यक आहे. तसेच युएईला जाण्यापूर्वी सर्व खेळाडूंना त्यांच्या शहरातून दोन चाचण्या घेतल्यानंतर संघात सामील व्हावे लागेल. त्यानंतर ७ दिवस त्यांना अलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. या दरम्यान त्यांच्या पाच चाचण्या होतील. सर्वांचा निगेटिव्ह अहवाल आल्यानंतरच खेळाडू संघासह युएईमध्ये जाऊ शकतील. प्रत्येक संघात फक्त २४ खेळाडू असतील.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post