गुड न्युज : आठ हजार नगरकर झाले ठणठणीत


*आज तब्बल ७२० रुग्णांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज तर वाढले ७२ नवे रुग्ण*
माय अहमदनगर वेब टीम
*अहमदनगर*: जिल्ह्यात बरे होणार्‍या रुग्णसंख्येने आज आठ हजारांचा टप्पा ओलांडला. आज एकूण ७२० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे बरे होणार्‍या रुग्णांची संख्या आता ८४६१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ७४.५८ टक्के इतकी आहे. दरम्यान, काल (बुधवार ) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ७२ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २७६० इतकी झाली आहे.

बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ३०, नगर ग्रामीण २४, कॅन्टोन्मेंट ०२, नेवासा १०, पारनेर ०३, शेवगाव ०१, मिलीटरी हॉस्पिटल ०१ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज एकूण ७२० रुग्णांना घरी सोडण्यात आले. यामध्ये मनपा २६९, संगमनेर २१, राहाता ६५ ,पाथर्डी ४३, नगर ग्रा. ४४, श्रीरामपूर १९, कॅन्टोन्मेंट २२, नेवासा २२, श्रीगोंदा ३०, पारनेर ३३, अकोले ०२, राहुरी ०८, शेवगाव ३२, कोपरगाव ६२, जामखेड १७, कर्जत २६, मिलीटरी हॉस्पिटल ०४ , इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

*बरे झालेली रुग्ण संख्या:८४६१*
*उपचार सुरू असलेले रूग्ण:२७६०*
*मृत्यू:१२४*
*एकूण रूग्ण संख्या:११३४५

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post