सचिन पायलट यांनी पुन्हा धरला गेहलोत यांचा हात!

 



माय अहमदनगर वेब टीम

जयपूर - काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी बंदोखोरी करून राजस्थानमधील राजाकारण ढवळून काढले. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याशी झालेल्या राजकीय वाद चांगलाच रंगला होता. मात्र काही दिवसातच पायलट यांचे बंड शमले व ते पुन्हा आपल्या स्वगृही परतले. या राजकीय घडामोडीनंतर पायलट यांनी आज (दि. १३) मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची भेट घेतली आहे. ही भेट मुख्यमंत्री निवासस्थानी झाली. २० जून रोजी दोघांची शेवटची भेट झाली होती. 


उद्या (शुक्रवार)पासून राजस्थान विधानसभेचे अधिवेशन सुरू होत आहे. दरम्यान, अधिवेशनापूर्वी आज आपली भेट घ्यावी असे मुख्यमंत्री गेहलोत यांनी सचिन पायलट यांना निरोप पाठवला होता. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीच्या अर्धा तास आधीच पायलट यांनी गहलोत यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. सचिन पायलट यांचे सर्व समर्थक आमदारही यावेळी उपस्थित होते. 


राजस्थान सरकारमध्ये भूकंप घडवत काँग्रेसला धक्का देऊन बंडाचा झेंडा उभा करणारे सचिन पायलट यांनी पुन्हा काँग्रेसचा हात धरला आहे. ते आता काँग्रेसमध्येच राहणार असून काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. काँग्रेस पक्ष आणि सरकारला साथ देणार, असेही त्यांनी म्हटले आहे. काँग्रेस पक्षातर्फे सचिन पायलट यांचे बंड शमल्याचे जाहीर करण्यात आले आहे. सचिन पायलट यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांची भेट घेतली होती.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post