गेल्या 24 तासांत वाढले 528 रुग्ण



 माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर : जिल्ह्यात बरे होणार्‍या रुग्णसंख्येने आज आठ हजारांचा टप्पा ओलांडला. आज एकूण ७२० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे बरे होणार्‍या रुग्णांची संख्या आता ८४६१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ७१.७० टक्के इतकी आहे. दरम्यान, काल (बुधवार ) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५२८ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३२०८ इतकी झाली आहे.


जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ७६, अँटीजेन चाचणीत २०२ आणि खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २५० रुग्ण बाधीत आढळले.


 जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ३४, नगर ग्रामीण २४, कॅन्टोन्मेंट ०२, नेवासा १०, पारनेर ०३, शेवगाव ०१, मिलीटरी हॉस्पिटल ०१ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.


अँटीजेन चाचणीत आज २०२ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, संगमनेर २४, राहाता २४, पाथर्डी १९, नगर ग्रामीण ०२, श्रीरामपुर १४, नेवासा २२, श्रीगोंदा १७, पारनेर ०८, अकोले १७ राहुरी ०६, शेवगाव २६,  कोपरगाव ०५, जामखेड १३ आणि कर्जत ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे.


खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या २५० रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा २०७, संगमनेर ०६, राहाता ०८, पाथर्डी ०१, नगर ग्रामीण ०५, श्रीरामपुर ०३, कॅन्टोन्मेंट ०१, नेवासा ०५, पारनेर ०३, अकोले ०४, राहुरी ०३, शेवगाव ०३, कोपरगाव ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.



 दरम्यान, आज एकूण ७२० रुग्णांना घरी सोडण्यात आले. यामध्ये मनपा २६९, संगमनेर २१, राहाता ६५ ,पाथर्डी ४३, नगर ग्रा. ४४, श्रीरामपूर १९, कॅन्टोन्मेंट २२, नेवासा २२, श्रीगोंदा ३०, पारनेर ३३, अकोले ०२, राहुरी ०८, शेवगाव ३२, कोपरगाव ६२, जामखेड १७, कर्जत २६, मिलीटरी हॉस्पिटल ०४ , इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

 

*बरे झालेली रुग्ण संख्या:८४६१*

*उपचार सुरू असलेले रूग्ण:३२०८*

*मृत्यू:१३२*

*एकूण रूग्ण संख्या:११८०१*


*(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)*



*STAY HOME STAY SAFE*


*प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा*


*स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या*


*अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा*


*खोटी माहिती पसरवू नका;पसरू देऊ नका*

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post