सॅनिटायझरचा वापर अधिक करताय ? मग 'ही' बातमी आपल्यासाठी!

 

माय अहमदनगर वेब टीम

मुंबई - कोरोनाचे संक्रमण वाढले आणि गेल्या काही महिन्यांपासून सॅनिटायझरचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला. मात्र त्यामुळे साबण लावून हात धुण्याची सवय बाजूला पडत आहे. सॅनिटायझरचा अतिरेक होत असल्याने हातांच्या त्‍वचेचे त्रास वाढले आहेत. त्यामुळे साबणाने हात धुण्याची सवय सोडू नका असे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

लोक घराबाहेर पडताना आजकाल सॅनिटायझरच्या छोट्या बाटल्या सोबत बाळगतात. वेळोवेळी हातांना सॅनिटायझर लावून नागरिकांकडून निर्जंतुकीकरण केले जाते. कोरोनापासून बचाव करण्यासाठी ही एक चांगली सवय आहे. गाडी चालवताना, कारमध्ये किंवा पाणी उपलब्ध होणार नाही, अशा ठिकाणी सॅनिटायझरचा वापर करणे ही चांगली कल्पना आहे. पण पाण्याची उपलब्धता असलेल्या ठिकाणी हात पाण्यानेच धुतले पाहिजेत. याकडेही नागरिकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. 

सध्या सॅनिटायझरची सवय लागल्याने नागरिक घरातही साबण लावून हात धुण्यास टाळाटाळ करत आहेत. साबण लावून हात धुण्यासाठी जास्त वेळ जात असल्याने नागरिक घरात असतानाही सॅनिटायझरचा वापर करू लागले आहेत. मात्र घरात असताना तसेच पाण्याची सोय असलेल्या ठिकाणी साबण लावूनच हात धुण्यावर नागरिकांनी भर देणे गरजेचे असल्याचे डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले.

सॅनिटायझरच्या अती वापरामुळे स्किन कोरडी होते, स्किनला रिॲक्‍शन येतात. अनेकदा स्किन पातळ होऊन फाटते, ॲलर्जी होऊ शकते. त्यामुळे गरजेच्या वेळी सॅनिटायझरचा वापर नक्की करा. मात्र तुमच्या घरात ऑफिस मध्ये असेच पाणी आणि साबणाची उपलब्धता असलेल्या ठिकाणी हात साबणाने धुणे केव्हाही चांगले. किंबहुना आपण स्वच्छतागृहांचा वापर केल्यानंतर किंवा जेवण्याआधी हात पाण्याने स्वच्छ धुणे हीच योग्य पद्धत आपण हात स्वच्छ करण्यासाठी वापरावी असे डॉ. भारमल सांगतात.


हात धुताना या गोष्टी लक्षात ठेवा -

- हात धुताना किमान 20 सेकंदाचा नियम पाळा

- सतत हात धुवा

- सॅनिटायझरचा वापर कमी करा आणि साबणाचा वापर जास्त करण्याचा प्रयत्न करा.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post