जेव्हा पीएम मोदी मोराच्या संगतीत रमतात तेव्ह...!

 माय अहमदनगर वेब टीम

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निसर्गावरील प्रेम पुन्हा एकदा दिसून आले आहे. राजधानी दिल्लीतील लोक कल्याण मार्गावर पंतप्रधान मोदी पंतप्रधान देशाचा राष्ट्रीय पक्षी मोराला खायला घालताना दिसून आले. पंतप्रधानांनी आपल्या निवासस्थानी ग्रामीण भागाप्रमाणे रचना केली आहे. जेणेकरुन पक्षी आपली घरटे बांधू शकतील.


पंतप्रधान निवास लोक कल्याण मार्ग नवी दिल्लीत असून ते १२ एकरांवर पसरले आहे. पंतप्रधानांच्या निवासस्थानी एकूण पाच बंगले आहेत. याखेरीज अनेक बागांही असून जिथे प्राणी व पक्ष्यांची मुक्त हालचाल करण्याची सोय आहे. अधिकृत निवासस्थानावर पंतप्रधानांच्या कामकाजाशी संबंधित अनेक कार्यालये आहेत. या घराच्या संरक्षणाची जबाबदारी विशेष संरक्षण गटावर आहे, तर घराबाहेरची सुरक्षा एकत्रितपणे दिल्ली पोलिस आणि इतर एजन्सी हाताळतात.


व्हिडिओमध्ये पीएम मोदी मॉर्निंग वॉक दरम्यान वेगवेगळ्या प्रसंगी मोरांसह दिसले आहेत. हा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांनी डिस्कव्हर चॅनलवरील 'मॅन vs वाईल्ड' कार्यक्रमाममधे पीएम मोदींनी मगर विषयी त्यांच्या बालपणीच्या आठवणी सांगितल्या होत्या. त्यांनी सांगितले होते की बालपणात, ते एका गेममध्ये मगरीला घेऊन आले होते, परंतु आईने समजावल्यावर परत नदीत सोडली होती.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post